छत्रपती घराण्यातील शिवाजीराजे भोसले यांचे निधन

सातारच्या राजघराण्यातील खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांच्यातील वैरत्व विकोपाला गेलेले असताना छत्रपती शिवाजीराजे भोसले Shivajiraje Bhosale यांनी त्यांच्यात मनोमिलन reconciliation घडविले होते.
Chhatrapati Shivajiraje  Bhosale
Chhatrapati Shivajiraje Bhosalesarkarnama

सातारा : सातारच्या छत्रपती घराण्यातील श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे (वय ७५) पुणे येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना आज सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात कन्या वृषालीराजे भोसले व एक नातू असा परिवार आहे. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ते चुलते होत.

आज रात्री उशीरा त्यांचे पार्थिव साताऱ्यातील अदालतवाडा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे. उद्या (बुधवारी) त्यांच्यावर राजघराण्याच्या प्रथेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राजघराण्याचे छत्रपती शाहू महाराज आणि राजमाता सुमित्राराजे भोसले यांचे छत्रपती शिवाजीराजे भोसले हे सुपूत्र होते.

Chhatrapati Shivajiraje  Bhosale
ऐतिहासिक राजवाड्याचा रूबाब कायम राहण्यासाठी तो आमच्या ताब्यात द्या... उदयनराजे

शिवाजीराजे यांचा जन्म २३ एप्रिल १९४७ मध्ये झाला. साहित्य, कला, क्रिडा, सांस्कृतिक व सामाजिक कार्यात त्यांचे भरिव योगदान होते. सलग सहा वर्षे ते साताऱ्याचे नगराध्यक्ष होते. १५ मे १९८५ ते १६ डिसेंबर १९९१ या कालावधी त्यांनी साताऱ्याचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी आपली कारकिर्द गाजवली होती. त्यांनी त्यावेळी समाजपयोगी विविध विकास कामे केली.

Chhatrapati Shivajiraje  Bhosale
सामाजिक प्रश्नावर खासदार उदयनराजे उभारणार स्वतंत्र यंत्रणा...

सातारच्या राजघराण्यातील खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील वैरत्व विकोपाला गेलेले असताना शिवाजीराजे भोसले यांनी त्यांच्यात मनोमिलन घडविले. त्यांना खेळाविषयी प्रचंड आकर्षण होते. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशचे ते राज्य उपाध्यक्ष होते. सातारा जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष होते.

Chhatrapati Shivajiraje  Bhosale
शंभुराज देसाईंचा सातारा जिल्ह्याचा मास्टर प्लॅन ठरला...

तसेच शिक्षण क्षेत्रात ही त्यांचे योगदान होते. ते आरे गावच्या श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते. तसेच श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज सेवाधाम अग्नि मंदीर करंजे यांचे कार्याध्यक्ष होते. शिवाजीराजे हे गेली ७५ वर्षे साताऱ्यातील अदालतवाडा येथे राहात होते. अदालत वाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून न्यायनिवाडा करणारा वाडा म्हणून परिचित होता. आजही या वाड्यातून दिलेला शब्द तसेच आदेश सातारकर पाळतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in