पौरोहित्य हा ब्राह्मणांचा धंदा, धर्म नाही

मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी पौरोहित्य हा ब्राह्मणांचा धंदा आहे. धर्म नाही, असे ठासून सांगितले.
पौरोहित्य हा ब्राह्मणांचा धंदा, धर्म नाही
Chhagan BhujbalSarkarnama

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षतर्फे कोल्हापूरमधील तपोवन मैदानात संकल्प सभेचे आज आयोजन करण्यात आले आहे. या सभेला राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित आहेत. या सभेत बोलताना मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात ब्राह्मण संघटनांकडून सुरू असलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत पौरोहित्य हा ब्राह्मणांचा धंदा आहे. धर्म नाही, असे ठासून सांगितले. त्यामुळे राज्यात पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ( Chhagan Bhujbal said, priesthood is the business of Brahmins, not religion )

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, राज्यात धार्मिक द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना कळायला हवे हा महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूरने पुन्हा नवीन दिशा दाखविली आहे. धर्मांध सत्तेच्या विरोधात उभे रहायला शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार शक्ती देतात.

Chhagan Bhujbal
मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करा; ब्राम्हण बहुभाषिक संघाची मागणी

ते पुढे म्हणाले की, महागाई, बेरोजगारी, इंधनदरवाढ होत आहे. अर्थव्यवस्थेची वाट लागली आहे. कोळश्याचे संकट निर्माण झाले आहे. देशात युपीएचे सरकार असताना महागाईचा दर साडेचार टक्के होता. आता हाच महागाई दर 14 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. महागाई वाढत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर वेगात वाढत आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर नोटाबंदी झाली, जीएसटीचा घोटाळा केला. देशातील सरकारी कंपन्या विकत आहेत.

आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात ब्राह्मण समाजातर्फे सुरू असलेल्या आंदोलना संदर्भात भुजबळ म्हणाले, आता ब्राह्मण बंधू चिडलेले आहेत. 165 वर्षांपूर्वी महात्मा फुले यांनी तृतीयरत्न नाटक लिहिले. त्यात चामड्याचा चर्मकाराचा धंदा आहे. सुतार काम हा सुताराचा धंदा आहे. तसे पौरोहित्य हा धंदा असल्याचे सांगितले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांच्या पुस्तकांतून हेच सांगितले आहे. तसे नसते तर आमच्या त्र्यंबकेश्वरमध्ये स्थानिक ब्राह्मण व उत्तर भारतातील ब्राह्मणांत वाद का झाला? ब्राह्मण आता चर्म, सोने-चांदी आदी व्यवसायातही आले आहेत. मात्र देवळावर त्यांचे 100 टक्के आरक्षण. तिथे तुमचे आरक्षण शाबीत ठेवता. आम्हालाही शिकवा, मिटकरीही येतील शिकायला. घरच्या घरी पूजा करू. पौरोहित्य हा ब्राह्मणांचा धंदा आहे. धर्म नाही, असा टोलाही मंत्री भुजबळ यांनी लगावला.

Chhagan Bhujbal
...म्हणून थोरातांच्या कारखान्यात विखे होते चेअरमन

महाराष्ट्राला मारायचा प्रयत्न

महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचे काम चालू आहे. महाराष्ट्रातील उद्योग, प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत. महाराष्ट्रातील उद्योग संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुमच्या तिजोरीत सर्वात जास्त पैसा महाराष्ट्रच टाकतो हे ते विसरत आहेत. महाराष्ट्राला मारायचा प्रयत्न करू नका. त्यांच्या नेत्यांना डावलण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्र भारताचा आधार आहे, असे त्यांना स्पष्ट केले.

श्रीखंडीसारखी लढाई

भोंग्याचे राजकारण करायचे. दंगे भडकविण्याचे काम सुरू आहे. पेट्रोल पंपावर भोंगे लावा म्हणजे लोकांना महागाई किती वाढली आहे ते कळेल. आम्ही बोलू लागलो की, प्राप्तीकर, ईडीची कारवाई करायची. भाजप नेत्यांनी सांगितले की ईडी कारवाई करते. भाजप श्रीखंडीसारखी लढाई लढत आहे. राजकारणाच्या मैदानात आम्ही बोललो तर कारवाई होते. ईडीकडून कारवाई होते कारण त्यात जामीन होत नाही. कुटुंबे भरडली जातात. वर्षांनुवर्षे तपास चालतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाविषयी बोलताना सांगितले होते की, चुकीच्या माणसांच्या हातात देश गेला तर अडचण झाल्या शिवाय राहणार नाही. तेच सध्या होत आहे, असे भुजबळांना सांगितले.

Chhagan Bhujbal
मंत्री गडाखांच्या स्वीय सहाय्यकावर बेछूट गोळीबार

राज ठाकरेंचा अवस्था पिंजरा चित्रपटासारखी

मनसे प्रमुख राज ठाकरे हे पूर्वी भाजपवर टीका करायचे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची स्तुती करायचे. त्यांची मुलाखत घ्यायचे. आता तेच राज ठाकरे भाजपचे गुणगाण करत आहे. शरद पवार यांच्या टीका करत आहेत. राज ठाकरेंची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे. ते आता कमळीचे तुणतुणे वाजवत आहेत, अशी टीका भुजबळांना केली.

भारत जलाओ पार्टी

देशात दंगली भडकविण्याचे काम सुरू आहे. नोटीस न देता बुलडोजर चालविले जात आहेत. शेवटी सर्वोच्च न्यायालयाला मधे यावे लागले. भाजप म्हणजे भारत जलाओ पार्टी आहे. लोकांना उचकवून द्यायचे. ज्या शरद पवारांना 40 वर्षे एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी काम केले. त्यांच्याच घरावर हल्ला करण्यात आला. गुणरत्न सदावर्तेंनी हे कशासाठी केले. आता राणा पती-पत्नी हनुमान चालिसा म्हणण्यासाठी मुंबईत आले. त्यांना मंदिरात जाऊन हनुमान चालिसा म्हणायला हवी होती. इकडे का? त्यांना शिवसैनिकांनी गराडा घातला. सकाळपासून गोंधळ चालू होता. यावर देवेंद्र फडणवीस दिवसभर काही बोलले नाहीत. संध्याकाळी देवेंद्र फडणवीस म्हणतात, कोणाच्या घरी जाऊन आंदोलन करण्याला भाजप समर्थन करत नाही, असे सांगितले. मग दिवसभर काय झोपला होता का? प्रत्येक क्षेत्रात खासगीकरण सुरू आहे. सगळे विकायचे काम सुरू आहे. ओबीसींचे आरक्षण आडमार्गाने रद्द करण्याचे काम सुरू आहे. मात्र ओबीसींचे आरक्षण आम्ही मिळवूच. ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत, असेही मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.