पारनेरच्या नगराध्यक्षावर गुन्हा दाखल : अधिकाऱ्याला केली होती मारहाण

पारनेर नगरपंचायतमध्ये अभियंता सचिन राजभोज यांना राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांनी मारहाण केली होती.
Vijay Auti- Parner Mayor
Vijay Auti- Parner Mayor Sarkarnama

अहमदनगर - पारनेर नगरपंचायतमध्ये दोन दिवसांपूर्वी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सचिन राजभोज यांना राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांनी समर्थकांसह मारहाण केली होती. या मारहाणीची सीसीटीव्ही क्लिप व्हायरल झाली होती. या संदर्भात पारनेर नगरपंचायतमधील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांनी नगराध्यक्ष औटींविरोधात पोलिसात काल (बुधवारी) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ( Charge filed against Parner's mayor: Officer was beaten )

पारनेर नगरपंचायत कार्यालयात गोंधळ घालून पाणीपुरवठा अभियंता सचिन बाळकृष्ण राजभोज यांना धमकावल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या फिर्यादीवरून नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांच्याविरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vijay Auti- Parner Mayor
पारनेरच्या नगराध्यक्षाने शासकीय अधिकाऱ्याला केली मारहाण

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनीता भिकन कुमावत (वय 36, मूळ रा. मोरगे वस्ती, प्रभाग क्रमांक सात, हल्ली रा. लोणी रस्ता, पारनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की पारनेर नगरपंचायतीमध्ये पाणीपुरवठा अभियंता सचिन बाळकृष्ण राजभोज हे मंगळवारी (ता. 5) दुपारी सव्वाबारा वाजता शासकीय काम करीत होते. त्यावेळी नगराध्यक्ष विजय औटी यांनी मोठ्याने आरडाओरडा करून अश्लील शिवीगाळ केली. त्यांना मारहाण करण्याची धमकी देऊन धाक दाखविला. त्यानुसार पारनेर पोलिसांनी नगराध्यक्ष विजय औटींविरोधात अश्लील शिवीगाळ, धमकावणे याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, पोलिस निरीक्षक घनश्‍याम बळप यांनी घटनास्थळाला भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक राजेश काळे तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com