अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत सत्तांतर

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची ( Ahmednagar District Primary Teachers Bank ) निवडणूक जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर ( Digvijay Aher ) यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
Ahmednagar District Primary Teachers Bank
Ahmednagar District Primary Teachers BankSarkarnama

नगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत सत्ताधारी व विरोधकांत मागील महिन्याभरापासून आरोप प्रत्यारोप होत होते. अखेर शिक्षक बँकेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीने आरोप-प्रत्यारोपांना सभासदांनी मतदानातून कौल दिला.

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी अविनाश निंभोरे तर उपाध्यक्षपदी गंगाराम गोडे यांची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदाची निवडणूक झाली. तर उपाध्यक्षपदाची बिनविरोध निवड झाली. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यांना सहकार्य बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे यांचे लाभले.

Ahmednagar District Primary Teachers Bank
प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन तर जिल्हांतर्गत बदल्या ऑफलाईन होणार 

यावेळी बँकेच्या संचालक सीमा क्षिरसागर, उषा बनकर, मंजुषा नरवडे, विद्युल्लता आढाव, संतोष अकोलकर, दिलीप औताडे, राजेंद्र मुंगसे, नानासाहेब बडाख, संतोष दुसुंगे, शरद सुद्रिक, अर्जुन शिरसाठ, अनिल भवार, सलीमखान पठाण, सुयोग पवार, किसन खेमकर, बाळासाहेब मुखेकर, बाबा खरात, राजू रहाणे, साहेबराव अनाप आदी उपस्थित होते.

बापूसाहेब तांबे गटाचे किसन खेमनर व रावसाहेब रोहकले गटाचे अविनाश निंभोरे यांच्या अध्यक्षपदाची लढत झाली. यामध्ये अविनाश निंभोरे हे 13 तर किसन खेमनर यांना अवघी आठ मते मिळाली. त्यात निंभोरे विजयी झाले. उपाध्यक्षपदी गंगाराम गोडे यांची बिनविरोध निवड झाली.

Ahmednagar District Primary Teachers Bank
अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांच्यावर जीवघेणा हल्ला

यामध्ये निंभोरे यांना सूचक म्हणून माजी उपाध्यक्ष नानासाहेब बडाख तर अनुमोदक म्हणून राजू मुंगसे होते. खेमनर यांना सूचक सलिमखान पठाण होते. तर अनुमोदक म्हणून साहेबराव अनाप होते. गोडे यांना सूचक म्हणून अर्जुन शिरसाठ व अनुमोदक म्हणून बाळासाहेब मुखेकर होते.

अविनाश निंभोरे यांची अध्यक्षपदी निवड होण्यासाठी शिक्षक परिषदेचे नेते रावसाहेब रोहोकले, संजय शेळके, प्रवीण ठुबे, विकास डावखरे, संजय शिंदे,भाऊसाहेब ढोकरे आदींचे मार्गदर्शन लाभले.

सहा संचालक फूटले

गेल्या आठ दिवसांपासून बापूसाहेब तांबे गटाचे चार संचालक नेत्यांच्या संपर्कात नव्हते. त्याच संचालकांवर बापू तांबे यांचा विश्वास सर्वाधिक होता. त्यातीलच काही व इतर असे एकूण सहा जण फुटलेले आहेत.

शिक्षक बॅंकेच्या पदाधिकारी निवडीत घोडेबाजार झालेला आहे. त्यामुळे बापूसाहेब तांबे गटाचे सर्व संचालक येत्या दोन दिवसात आपल्या पदाचे राजीनामे जिल्हा उपनिबंधकांना सादर करतील. या बाबतचा निर्णय लवकरच होणार आहे.

- सलिमखान पठाण, माजी अध्यक्ष, जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंक.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com