राज्यातील हिंसेची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून करा

रझा अकादमीवर (Raza Academy) बंदी घालण्याची मागणी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama

पुणे : त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना, जगात कोठेतरी मशिदीची नासधूस झाल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल करून, राज्यातील मालेगाव, अमरावती (Amravati Violence) व नांदेड (Nanded Riot) येथे दंगली करण्यात आल्या. याबाबत आज (ता.23 नोव्हेंबर) कोल्हापूरात या घटनेचा भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला. व दंगल घडविणाऱ्यांवर कडक कारवाई व अटक करण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व शिष्टमंडळाने राज्यसरकारकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांंनी कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्याकडे दिले.

Chandrakant Patil
राज्य सरकारची दोन वर्षे विकासाची नव्हे तर विनाशाची

यावेळी पाटील यांच्यासोबत माजी मंत्री सुभाष देशमुख, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, भाजपा शहराध्यक्ष राहूल चिकोडे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव, भाजपा शहर संघटन सरचिटणीस अशोक देसाई, भाजपा ग्रामीण संघटन सरचिटणीस नाथाजी पाटील, सरचिटणीस विजय जाधव, विठ्ठल पाटील, दिलीप मेत्रांणी, जिल्हा उपाध्यक्ष राहूल देसाई यांची उपस्थिती होती.

पाटील यांनी निवेदनात म्हटले की, त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव, अमरावती व नांदेड येथे अफवा पसरवून व धार्मिक भावना भडकवून दंगल घडविण्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत करण्यात यावी, दंगलीतील सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना अटक करावी, दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घालावी. तसेच, स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करत, भाजपचे नेते व कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रहदूषित कारवाई थांबवावी आणि त्यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.

Chandrakant Patil
भाजपचे नेते हॉटेलात असल्याचे समजताच काँग्रेस आमदाराने काढला पळ

पाटील म्हणाले, या सर्व मागण्या आम्ही फक्त राजकीय विरोधीपक्ष म्हणून न करता ही घटना महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याने करत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर हे निवेदन मुख्यमंत्र्यांना आहे तसे न पाठवता जिल्ह्यातील याविषयातील घटनांचा जिल्हास्तरीय अहवालही सोबत पाठवा अशी विनंती देखील करण्यात आली.

यानंतर माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, राज्यात अराजकता माजली असून कोणत्याही गोष्टीवर शासनाचा वचक राहिला नाही. पोलीस यंत्रणा हप्ते, दडपशाही, न्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणा-यांवर धाक दाखवण्यापुरती वापरली जात आहे. दंगलखोरांना अभय देण्याचे काम सुरु आहे. झुंडशाहीची प्रकार घडत असून आता पोलिसांवर देखील हल्ले होऊ लागले आहेत. फक्त जातीच्या राजकारणासाठी, सत्तेच्या हव्यासापोटी अशा गंभीर घटनेकडे कानाडोळा करण्याचे कार्य हे सरकार करत आहे. असा घणाघात त्यांनी राज्यसरकारवर केला.

Chandrakant Patil
नवीन वर्षात भाजपचं सरकार येणार : चंद्रकांत पाटील

2014 ते 2019 मध्ये केंद्रातील सरकार आणि राज्यातील सरकार असताना एकही दंगल घडली नाही. मात्र, आता चाळीस हजाराचे मोर्चे निघत आहेत. मात्र, याबाबतची माहिती पोलीस यंत्रणेला माहित नसणे हे दुर्देवी आहे. तसेच, अशा हिंसक मोर्चावर पोलीस कारवाई होत नाही पण अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी शांततेने सुरु असणाऱ्या मोर्चावर कारवाई असा अजब न्याय सुरु आहे. असा आरोपही त्यांनी केला.

या घटनेची निपक्षपणे चौकशी व्हायची असेल तर याची पाळेमुळे शोधून काढली पाहिजेत. त्यामुळे भाजपाच्या वतीने काल झालेली निदर्शने, धरणे, निवेदने हा सरकारला इशारा असल्याचे त्यांनी सांगितले. कान - नाक - डोळे बंद ठेवून आजचा दिवस पुढे ढकलणा-या या राज्यकर्त्याकडे राज्यातील जनता लक्ष ठेवून असून योग्य वेळ धडा शिकवेल, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com