धनंजय महाडिक निवडून येणार आणि एक बडा नेता पडणार : चंद्रकांतदादांचा बॉम्ब

Chandrakant Patil | BJP | Dhananjay Mahadik : महाडिकांच्या विजयासाठी भाजपची टॉप टू बॉटम यंत्रणा कामाला
धनंजय महाडिक निवडून येणार आणि एक बडा नेता पडणार : चंद्रकांतदादांचा बॉम्ब
Dhananjay Mahadik News, Chandrakant Patil News, Rajyasabha election 2022 Newssarkarnama

कोल्हापूर : राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार निवडून येणार आहेत. यासाठी भाजपाने पक्के नियोजन केले आहे. पण त्यासाठी निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार करणार नाही. सहाव्या जागेवरुन आरोप-प्रत्यारोप होत असले तरी भाजपचे धनंजय महाडिक हे १०० टक्के निवडून येणार. पण त्याचवेळी आघाडीतील बडा नेता नेता पडणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने आमच्यासोबत चर्चा करुन त्यांच्यातील एक उमेदवार मागे घ्यावा", असा खळबळजनक दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री मैदानात.

भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना भाजपने (BJP) राज्यसभेच्या रिंगणात उतरवले आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार पियुष गोयल (Piyush Goyal) आणि अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्या रुपाने भाजपच्या २ जागा आरामात निवडून येणार आहेत. मात्र धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्यारुपाने भाजपने तिसरा आणि अतिरीक्त उमेदवार दिला आहे.

दरम्यान महाडिक यांना निवडून आणण्याची जबाबदारी भाजपने केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांच्यावर सोपविली आहे. भाजपने आज राज्यसभा निवडणुकीसाठी ४ राज्यांच्या निवडणूक प्रभारींची घोषणा केली आहे. यात राजस्थानसाठी केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर, हरियाणासाठी मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, कर्नाटकसाठी मंत्री जी.किशन रेड्डी, तर महाराष्ट्रासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची प्रभारी म्हणून घोषणा केली आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी भाजपने आपला अतिरीक्त उमेदवार रिंगणात उतरवला आहे, अशा ठिकाणी प्रभारींची घोषणा करण्यात आल्याच पाहायला मिळत आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी राज्यात निवडणूक जाहीर झाली आहे. यात विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसची एक, काँग्रेसची एक आणि शिवसेनेची एक जागा निवडुन येवू शकते. तर महाविकास आघाडीकडील अतिरीक्त मतांच्या आधारावर शिवसेना वैयक्तिक दुसरी आणि निवडणुकीतील सहावी जागा लढवत आहे. तर भाजपने तिसरा उमेदवार मैदानात उतरवला आहे.

या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उत्तरप्रदेशमधील कवी आणि काँग्रेसचा अल्पसंख्यांक चेहरा समजले जाणारे इम्रान प्रतापगडी, तर राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. तर शिवसेनेने विद्यमान खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत आणि कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने तिसरा उमेदवार घोषित केल्यामुळे निवडणुकीची चुरस वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in