धनंजय महाडिक राज्यसभेवर गेल्याने कोल्हापूर लोकसभा कोण लढवणार? चंद्रकांतदादांनी स्पष्टच सांगितले

चंद्रकांत पाटील यांची महाविकास आघाडीवर टिका
धनंजय महाडिक राज्यसभेवर गेल्याने कोल्हापूर लोकसभा कोण लढवणार? चंद्रकांतदादांनी स्पष्टच सांगितले
Chandrakant PatilSarkarnama

कोल्हापूर : धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना खासदारकी मिळाल्याने जिल्ह्यात भाजपची (BJP) ताकद वाढली आहे. याचा प्रत्यय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाहायला मिळेल. मित्रपक्षांना बरोबर घेऊन आम्ही सर्व निवडणुका लढणार आहोत. बहुतांशी जागा कमळ चिन्हावरच लढवू. मित्र पक्ष, आघाड्या यांची ताकद आहे, अशा ठिकाणी त्यांच्या उमेदवारांना तिकीट देऊ, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी पाटील म्हणाले, ''महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) कारभाराला जनता व सत्ताधारी पक्षातील आमदारच त्रासले आहे. याचा प्रत्यक्ष राज्यसभा निवडणुकीत दिसून आला. विधान परिषदेलाही हाच परिणाम दिसून येईल. महाडिक यांना राज्यसभा मिळाल्याने जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे.

Chandrakant Patil
आमदारांची काळजी घ्या : शरद पवारांची राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना तंबी

त्यांचा सर्व गट हा भाजपमध्ये आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वबळावरच लढवणार आहे. काही ठिकाणी मित्रपक्षांचा, आघाड्यांचा प्रभाव आहे. त्या ठिकाणी आम्ही त्यांना प्राधान्य देऊ. बहुतांशी जागा कमळ चिन्हावरच लढवल्या जाणार आहेत. महापालिका आणि जिल्हा परिषद याठिकाणी परिवर्तन होणार हे नक्की. महाडिक आता सत्ताधाऱ्यांच्या मुजोरीला लगाम घालतील.

Chandrakant Patil
विधान परिषद : भाजपच्या पाचव्या जागेचे गणित सोपे नाही.. 22 आमदारांना `पटवावे` लागेल!

लोकसभेचे उमेदवार तय्यार आहेत

धनंजय महाडिक राज्यसभेवर गेल्याने आता कोल्हापुरातील लोकसभा कोण लढवणार असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार तयार आहेत. योग्यवेळी त्यांची नावे जाहीर करू, असेही पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in