चंद्रकांत पाटलांची गुगली : ..तर कोल्हापूरची निवडणूक बिनविरोध करू!

काही प्रस्थाव आला तर आम्ही विचार करु.
चंद्रकांत पाटलांची गुगली : ..तर  कोल्हापूरची निवडणूक बिनविरोध करू!
Chandrakant PatilSarkarnama

कोल्हापूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Legislative Council elections) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या ६ जागांसाठी निवडणूक होत आहे. मुंबईतील दोन, कोल्हापूर , धुळे-नंदुरबार, अकोला बुलडाणा वाशिम, नागपूर या ६ जागांसाठी निवडणूक होत आहे. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूरमध्ये भाजपने शौमिका महाडिक यांचा अर्ज भरला त्यावेळी विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाष्य केले.

Chandrakant Patil
निष्ठावंत नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजप आमदार चव्हाण म्हणाले...

या वेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, रजनी पाटील यांच्या राज्यसभेच्या आणि प्रज्ञा सातव यांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी विनंती केल्यामुळे ती निवडणूक बिनविरोध केली. त्या प्रमाणे काही प्रस्थाव आला तर आम्ही विचार करु. प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. मुंबईत चुरस निर्माण होऊ नये म्हणून आम्ही दुसरा अर्ज भरला नाही. तिथे आमचा एक उमेदवार निवडणून येईल. भाजपने उमेदवार दिले आहेत. भाजप, शिवसेना, आणि काँग्रेसने निर्णय घ्यायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ह्यामध्ये कुठेही नाही. चांगला प्रस्थाव आला तर विचार होउ शकतो असे सुचक वक्तव्य पाटील यांनी केले.

कोल्हापूरची निवडणूक तुल्यबळ होईल, असे पाटील म्हणाले. मात्र, नागपुरमध्ये आमच्याकडे ९० मते जास्त आहेत. काँग्रेसने भाजपच्या माणसाला फोडून उमेदवारी दिली आहे. ते काही काँग्रेसचे नाही, त्यामुळे त्यांच्यात भांडणे होतील. शिवसेनेकडून प्रस्थाव येण्याचा प्रश्नच नाही. त्यांची मुंबईची एक जागा निवडूण येवू शेकते. भाजपची भूमिका काय प्रस्थाव येईल याच्यावर ठरेल. मात्र, भाजप कोणताही प्रस्थाव देणार नाही. कोल्हापूरमध्ये आम्हाला ४३ मते लागतात. ती मते भाजपच्या उमेदवाराला मिळतील, अशी व्यवस्था आम्ही केली आहे.

Chandrakant Patil
राज्य सरकारची दोन वर्षे विकासाची नव्हे तर विनाशाची

लढत होईल ती अकोल्यामध्ये, कारण तीन वेळा आमदार असलेले शिवसेनेचे उमेदवार तिथे आहेत. मात्र, आम्हीही चांगला उमेदवार दिला आहे. सहा पैकी पाच जागा जिंकण्याची आमची ताकद आहे. आम्ही सगळ्या निवडणुका ताकतीने लढवत आहोत. उद्याच्या अर्ज माघारी नंतर बिनविरोध साठी बोलणी सुरु होऊ शकते. मात्र, काही निर्णय घ्यायचा असेल तर तो लवकर घ्यावा, असेही पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in