चंद्रकांत पाटील व सुजय विखे पाटलांनी नीट माहिती घेऊन बोलावं

महाविकास आघाडीचे नेते व भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
Sangram Kote Patil
Sangram Kote PatilSarkarnama

अहमदनगर - लोकसभेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी कोरोना उपाययोजनांवरून महाराष्ट्र व महाविकास आघाडीवर टीका केली होती. तसेच मोदींच्या कामची खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी संसदेत स्तुती केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी मोदी व सुजय विखे पाटलांवर टीका केली होती. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे नेते व भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ( Chandrakant Patil and Sujay Vikhe Patil should speak with proper information )

चंद्रकांत पाटील व सुजय विखे पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी युवकचे माजी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी आज सरकारनामाशी बोलताना भाजप नेत्यांवर टीका केली. संग्राम कोते म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बाबतीत भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील व खासदार डॉ. सुजय विखे यांनी नीट माहिती करून बोलावं.

Sangram Kote Patil
संग्राम कामाला लाग ! अजितदादांचा कोते पाटील यांना आदेश

कोते पुढे म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वयाचा आम्ही आदर करतो. मात्र सध्या ते सत्ता गेल्याने वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे ते रोज उठून काहीही आरोप करत आहे. कोरोना काळात खासदार सुप्रिया सुळेंनी व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोठं योगदान दिला आहे. जनतेचा भाजपला असलेल्या पाठिंब्या बाबत चंद्रकांत पाटील एवढेच ठाम असतील तर मग त्यांनी कोल्हापूरमधून कुठल्याही मतदार संघातून का निवडणूक लढवली नाही. त्यांना का पुण्याला यावं लागलं याचे उत्तर त्यांनी द्यावं, अशी टीकाही कोते यांनी केली.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विषयी बोलताना कोते म्हणाले, खासदार सुजय विखे यांनी संसदेत सांगितले की, मोदींनी सुरू केलेल्या योजना विरोधक राबवत नाही अथवा त्या बाबतीत आभार मानत नाही. त्याला स्वतः सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं. सुळे यांनी सांगितले की अनेक वेळेस सोशल मीडिया पोस्ट टाकून मोदी सरकारच्या ज्या योजना लोकाभिमुख आहे त्या बाबतीत आम्ही आभारच मानले आहेत. कोरोना संकटकाळामध्ये सुप्रिया सुळे व बाळासाहेब थोरात यांनी मोठं काम उभं केलं. काम थोडं आणि मार्केटिंग मोठं ही सुप्रिया सुळेंची कामाची पद्धत नाही.

Sangram Kote Patil
अजित पवारांना मुख्यमंत्री करा : संग्राम कोते 

हजारो कोरोना बाधितांच्या जेवणाची व्यवस्था असो, रेमडेसिविर, बेड्स उपलब्ध करून देण्याचा विषय असो सातत्याने त्यांनी प्रयत्न केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांनी सबंध राज्यातील काँग्रेसला संघटित करून कोविड रुग्णांना मदत केली. त्यांची जेवणाची राहण्याची तसेच आपापल्या राज्यात जाण्याची व्यवस्था केली तसेच थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या विविध सहकारी संस्थांचे जे जाळे आहेत त्या माध्यमातून देखील मोठी मदत थोरात यांनी उपलब्ध करून दिली.

ज्या रेल्वे महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गेल्या त्यावर पंतप्रधानांनी टीका केली. त्या रेल्वेच्या बाबतीत स्वतः सुप्रिया सुळे यांनी पोलखोल केली आहे. देवेंद्र फडणवीस व पियुष गोयल यांचे सर्व ट्विट्स त्यांनी काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर आणले. त्यातून भाजपचा दुतोंडीपणा लक्षात येतो. त्यामुळे यापुढे चंद्रकांत पाटील यांनी माहिती घेऊन बोलावे, असे संग्राम कोते पाटील यांनी म्हंटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com