Solapur Congress : सोलापुरातून शिंदे, म्हेत्रे, मोहिते पाटलांसह १९ जण करणार काँग्रेस अध्यक्ष निवडीसाठी मतदान

सोलापूर शहर व जिल्ह्यात प्रतिनिधी निवडण्यामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांचेच वर्चस्व दिसत आहे.
Sushilkumar Shinde-Praniti Shinde -Siddharam Mhetre
Sushilkumar Shinde-Praniti Shinde -Siddharam MhetreSarkarnama

सोलापूर : महाराष्ट्र कॉंग्रेसने (Congress) जाहीर केलेल्या प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या प्रतिनिधींमध्ये सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील १९ जणांचा समावेश आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून १४, तर सोलापूर शहरातून ५ जणांची निवड झाली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde), आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde), माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) यांचा या प्रतिनिधींमध्ये समावेश आहे. (Chance for 19 people from Solapur district in Congress regional representative)

या नूतन प्रतिनिधींची मुदत ही पाच वर्षे असून जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष, अखिल भारतीय कॉंग्रेस अध्यक्षा निवडण्यासाठी या प्रतिनिधींना मतदान करता येणार आहे. प्रदेशच्या कोणत्याही बैठकीला हजर राहता येणार असल्याने या निवडीला महत्व आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात प्रतिनिधी निवडण्यामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांचेच वर्चस्व दिसत आहे.

Sushilkumar Shinde-Praniti Shinde -Siddharam Mhetre
हायकोर्टाचा फडणवीसांना धक्का; कल्याणशेट्टींच्या प्रस्तावावरील शिफारस केली अमान्य!

ग्रामीणमधून निवड झालेल्या १४ जणांमध्ये माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हा बॅंकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे, माजी आमदार रामहरी रुपनवर, जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शाहीन शेख, नंदकुमार पवार, शिवानी बिराजदार, माजी आमदार धनाजी साठे, सुमित्रा उगले, तेजस्विनी मरूड, भीमाशंकर जमादार, साईनाथ बागल, सुशील बंदपट्टे यांचा समावेश आहे.

Sushilkumar Shinde-Praniti Shinde -Siddharam Mhetre
रामदास कदम त्यावेळी माझ्या पाया पडले होते....: भास्कर जाधवांनी सांगितली 'ती' गोष्ट

शहरी भागातून निवडण्यात आलेल्या प्रतिनिधींमध्ये आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी महापौर संजय हेमगड्डी यांचा समावेश आहे. नव्याने नियुक्त झालेल्या प्रतिनिधींची सोमवारी (ता. १९) मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश पीआरओ पल्लम राजू यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून यामध्ये महाराष्ट्र प्रभारी एस. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in