सातारा जिल्हा बँकेचे पुरस्कारांचे शतक; 'बँको ब्ल्यु रिबन' पुरस्काराने सन्मानित

या संस्थेने .या बँकेस सन २०१३ पासून २०२० पर्यंत ‘बेस्ट परफॉर्मन्स’ Best Performance व ‘बेस्ट टेक्नॉलॉजी’ Best technology ‘बेस्ट आय टी सेंटर, Best IT center अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.
Satara DCC Bank
Satara DCC Banksarkarnama

सातारा : अविज पब्लिकेशन कोल्हापूर आणि गॅलेक्सी इन्मा प्रा. लि. पुणे यांच्यावतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस देशातील जिल्हा बँक श्रेणीमधून ‘बँको ब्ल्यु रिबन २०२१ ’ हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार लोणावळा येथे मान्यवरांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला. तज्ञ समितीने केलेल्या मुल्यांकनानुसार सातारा जिल्हा बँकेस या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

बँको, देशभरातील जिल्हा बँका, अर्बन बँका, ग्रामीण बँका या सहकारी क्षेत्रातील बँकांचे कामाचे मुल्यमापन बँकोचे ज्युरीमार्फत करुन दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूणच उत्कृष्ठ कामकाज आणि रुपये ७५०० कोटीचे वर ठेवी असलेल्या देशातील जिल्हा बँक श्रेणीमधून सातारा जिल्हा बँकेस प्रथम क्रमांकाचे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Satara DCC Bank
सातारा जिल्हा बँकेची राष्ट्रीयकृत बँकांशी बरोबरी; सर्व कर्ज व्याजदरात केली कपात

हा पुरस्कार अविज पब्लिकेशनचे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे गुंडाळे, गॅलेक्सी इन्माचे संचालक अशोक नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत रिझर्व्ह बँकेचे माजी मुख्य सरव्यवस्थापक डी जी काळे यांचे हस्ते बँकेच्या संचालिका सौ. कांचन साळुंखे तसेच बँकेचे संचालक श्री. रामराव लेंभे, सुनील खत्री, श्री. ज्ञानदेव रांजणे, सौ. ऋतुजा पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, उपव्यवस्थापक श्री. संदीप शिंदे, अधीक्षक विश्वजित राजूरकर, प्रदीप बारटक्के, अनिल फाळके, अमोल गुजर, तानाजी जानुगडे यांचे समवेत पुरस्कार स्वीकारला.

Satara DCC Bank
कार्यकर्त्यांनो, जिल्हा परिषदेसाठी कामाला लागा!

या संस्थेने बँकेस सन २०१३ पासून २०२० पर्यंत ‘बेस्ट परफॉर्मन्स’ व ‘बेस्ट टेक्नॉलॉजी’ ‘बेस्ट आय टी सेंटर, अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. यावेळी श्री. डी. जी. काळे यांनी सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये आदर्श असणारी बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा विशेष उल्लेख केला. बँकेच्या कामकाजाची प्रशंसा केली. पुरस्काराबद्दल बँकेचे जेष्ठ संचालक व विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, बँकेने या पुरस्काराबरोबर १०० पुरस्कारांची बाजी मारली आहे. आदर्शवत व उज्वल परंपरा, पारदर्शक कारभार, उत्कृष्ट कार्यप्रणाली यामुळे बँकेची ख्याती राज्याबरोबरच देशातही झाली आहे.

Satara DCC Bank
सातारा जिल्हा बँकेने मोडला नफ्याचा विक्रम, १३३.९५ कोटी नफा

दर्जात्मक कामकाज, गुणवत्ता व आधुनिक बँकिंगव्दारे ग्राहकाभिमुख सेवा यामुळे आयएसओ ९००१-२०१५ मिळालेले मानांकन, तसेच सामाजिक बांधिलकी कायमच जपत असलेने बँकिंग क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमठविलेला आहे. संचालक व महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, बँकेला उत्कृष्ठ कामकाजाबद्दल नाबार्डचे सात व इतर नामांकित संस्थांचे पुरस्कार मिळालेले असून आजच्या पुरस्काराने बँकेने पुरस्कारांचे शतक केले आहे.

Satara DCC Bank
पैशांच्या बेमाप वापरामुळे माणच्या राजकारणाची प्रतिमा मलीन होतेय- नितीन पाटील

आपल्या बँकेने सहकारी बँकिंगपुढे चांगला आदर्श निर्माण केलेला आहे. बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील म्हणाले, बँकेने सर्वसामान्य शेतक-याला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्वपूर्ण योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. या पुरस्काराबद्दल बँकेचे संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई व सर्व संचालक सदस्य यांनी अभिनंदन केले .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com