रामराजे नाईक निंबाळकरांची हॅटट्रीक ; फलटणमध्ये जल्लोष

Legislative Council Election Results : विधान परिषद निवडणूक निकाल
Ramraje Naik Nimbalkar,Eknath Khadse
Ramraje Naik Nimbalkar,Eknath Khadsesarkarnama

फलटण : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवत विजयाची हॅटट्रीक केली आहे. आज झालेले विधान परिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council Election) त्यांना पहिल्या पसंतीची २८ मते मिळवत त्यांनी मोठा विजय मिळवला.

विधान परिषद निवडणूक निकालाची मतमोजणी सुरु होताच रामराजे यांचे एक मत बाद झाल्याचे व ते डेंजर झोनमध्ये असल्याचे वृत्त आले होते. त्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. मात्र, तरीही कार्यकर्त्यांना रामराजे हे निश्चितपणे विजयी होतील हा आत्मविश्वास होता व तो खरा ठरला.

Ramraje Naik Nimbalkar,Eknath Khadse
काँग्रेसवर मोठी नामुष्की : पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे पराभूत

रामराजे यांनी मिळविलेल्या या विजयामुळे त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस व राजकारणातील महत्व पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. रामराजे यांच्या विजयाचे वृत्त प्रसिध्द होताच फलटण शहर, तालुक्यातील व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. रामराजे यांच्या विजयाच्या घोषणा करीत ठिकठिकाणी फटाक्यांची आताषबाजी करुन हा विजय साजरा केला.

Ramraje Naik Nimbalkar,Eknath Khadse
एकनाथ शिंदेंची नाराजी शिवसेनेला भोवली?; 11 मतांना भाजपचा सुरुंग...

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत भाजपचे पाच उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीचे पाच उमेदवार विजयी झाले. काँग्रेसचे (Congress) चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५१ मते असताना सुद्धा रामराजे नाईक निंबाळकर यांना २८ आणि एकनाथ खडसे यांना २९ मते मिळाली. राष्ट्रवादीला ५८ मते मिळाली. यामध्ये निंबाळकर यांचे एक मत बाद झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com