Solapur News : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर फसवणूक, ॲट्रोसिटीचा गुन्हा : कर्जत, डहाणू, चिंचलखैरेमध्ये घेतल्या आदिवासींच्या जमिनी

फिर्यादी पडवळे यांच्या नावे जनकल्याण मल्टिस्टेट को.ऑप. क्रेडिट सोसायटीतून एक कोटी दहा लाख रुपयांचे परस्पर गहाण कर्ज मंजूर करून घेतले.
Rajendra Hazare
Rajendra HazareSarkarnama

सोलापूर : नोकरीचे व कंपनीत डायरेक्टर म्हणून घेण्याचे अमिष दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार विभागाचे राज्य उपाध्यक्षांसह तिघांनी संगनमत करून कर्जत, डहाणू व चिंचलखैरे येथील आदिवासींच्या जमिनी खरेदी केल्या. आदिवासी असल्याची माहिती असतानाही त्यांनी फसवणूक केली, अशी फिर्याद अमृत केशव पडवळे (रा. घोलवड, ता. डहाणू, जि. पालघर) यांनी सदर बझार पोलिसांत दिली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या सहकार विभागाचे राज्य उपाध्यक्ष तथा जनकल्याण मल्टिस्टेटचे राजेंद्र पुंडलिक हजारे यांच्यासह तिघांविरूद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. (Case registered against three people including a senior NCP leader in connection with the purchase of tribal land)

आदिवासी लोकांच्या जमिनी लिलावाशिवाय कोणालाही खरेदी करता येत नाहीत. तरीपण, अमर विजय जाधव (रा. सीवूड इस्टेट, नेरूळ, नवी मुंबई), यशवंत वसंतराव पाटील (रा. अलीदादा इस्टेट, कुर्ला) व राजेंद्र हजारे (रा. लोकमंगल विहार पाण्याच्या टाकीजवळ, बाळे) यांनी आपापसात संगनमत केले. कमी पैशात जमिनी लिलावाद्वारे खरेदी करता याव्यात; म्हणून फिर्यादी पडवळे यांच्या नावे जनकल्याण मल्टिस्टेट को.ऑप. क्रेडिट सोसायटीतून एक कोटी दहा लाख रुपयांचे परस्पर गहाण कर्ज मंजूर करून घेतले.

Rajendra Hazare
Karmala News : बागल भाजपच्या वाटेवर : भाजप नेत्यांना निमंत्रण; मात्र ‘आदिनाथ’ला मदत करणाऱ्या सावंतांचा विसर

त्यानंतर कर्जाची रक्कम बनावट विड्रोल स्लिप व बनवाट हस्तांतरण पत्राद्वारे यशवंत पाटील यांच्या बॅंक खात्यात वर्ग केली. त्यांनी कर्जत येथील जमीन कमी पैशांत लिलावाद्वारे विकत घेण्यासाठी हे कर्ज प्रकरण ‘एनपीए’ करून पुढील कार्यवाहीसाठी फिर्यादी पडवळे यांना पनवेल दिवाणी न्यायालयाची नोटीस पाठवली आहे.

त्यांनी न घेतलेले एक कोटी दहा लाखांच्या कर्जवसुलीसाठी दडपण आणले. गैरहानी करून फसवणूक केली, असेही फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे तपास करीत आहेत.

Rajendra Hazare
Nagpur RTO : नागपूरमध्ये आरटीओ अधिकारी बदल्यांचे रॅकेट? पंचतारांकित हॉटेलमध्ये काय शिजलं?

....त्यानंतरच पुढील कारवाई : तपास अधिकारी

फिर्यादी अमृत पडवळे यांनी आदिवासी जमिनी गैरमार्गाने खरेदी केल्याची व जनकल्याण मल्टिस्टेटमधून संमतीविना परस्पर एक कोटी १० लाखांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे.

या गुन्ह्यासंबंधीची संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यानुसार फिर्यादीकडून मूळ कागदपत्रे मागवली असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सोनवणे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com