Karuna Sharma| करुणा शर्मांवर गुन्हा दाखल; त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला

Karuna Sharma- Munde| Dhananjay Munde| करुणा मुंडे यांची तीन जणांनी फसवणूक केल्याची घटना गेल्या आठवड्यात समोर आली होती.
Karuna Sharma Latest News
Karuna Sharma Latest NewsSarkarnama

संगमनेर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पत्नी करुणा मुंडे ( Karuna Munde ) यांची तीन जणांनी फसवणूक केल्याची घटना गेल्या आठवड्यात समोर आली होती. अल्पावधीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून, एका कंपनीत सुमारे 30 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र याबाबत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी याबाबत संगमनेरातील तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पण आता या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे.

या प्रकरणी आता संगमनेरमध्ये करुणा शर्मा यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेरमधील कोंची येथील फिर्यादी भारत भोसले यांनी शर्मांविरोधात गुन्हा आरोप केला आहे. आर्थिक फसवणुकीसह धमकी दिल्याप्रकरणी भोसले यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात नवा पक्ष काढण्यासाठी करुणा शर्मा यांनी संबंधित तक्रारदाराकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

Karuna Sharma Latest News
करुणा मुंडेंना त्यांच्याच कार्यकर्त्यांनी लावला 30 लाखांना चुना : तीन जणांवर गुन्हा दाखल

करुणा शर्मा यांनी २२ लाख ४५ हजार रोख आणि १२ लाखांचे सोने घेतल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे. इतकेच नाही तर उसणे म्हणून दिलेली रक्कम आणि सोने शर्मांनी परत न केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भोसले यांच्या फिर्यादीवरून फसवणूकीच्या गुन्ह्यातंर्गत करुणा शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ७ जानेवारी ते २५ फेब्रुवारी २०२२ या काळात फिर्यादी भोसले आणि शर्मां यांच्यात व्यवहार झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

गेल्या आठवड्यात करुणा मुंडे यांनी भारत भोसले यांच्या विरोधात ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद दिली होती. संगमनेर पोलीस ठाण्यात भोसलेंविरोधात ऑगस्ट महिन्यात तक्रार दाखल केली आहे. धनंजय मुंडे यांच्याशी असलेल्या ओळखीतून, त्यांची पत्नी करुणा मुंडे यांचा विश्‍वास संपादन करीत, त्यांना लेवलसेट कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीबाबत माहिती दिली.

या कंपनीत 30 लाखांची आर्थिक गुंतवणूक केल्यास दरमहा 45 ते 70 हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले. तसेच यापेक्षा अधिक प्रमाणात नफा मिळाल्यास त्या प्रमाणात अधिक नफा देण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान काही महिन्यांपूर्वी आपल्या नवीन पक्ष स्थापनेच्या पार्श्वभुमीवर करुणा मुंडे यांनी संगमनेर येथे शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली होती. त्यात यातील आरोपींची ओळख नव्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून करुन दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in