भाजप खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल..

कोरोना (Covid-19) नियमाचे उल्लंघन करत सोलापुरातील (Solapur) धर्मवीर संभाजी महाराज चौकात गर्दी केली होती.
Ranjit Naike Nimbalkar
Ranjit Naike NimbalkarSarkarnama

सोलापुर : कोरोनामुळे जमावबंदी असताना सुद्धा लोकांना जमवल्या प्रकरणी भाजप (BJP) खासदार रणजित नाईक निंबाळकर (Ranjit Naik Nimbalkar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच बरोबर भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यावरही शहरातील चावडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ranjit Naike Nimbalkar
मोठी बातमी : भावना गवळींच्या अडचणी वाढल्या; ईडीकडून कंपनीच्या संचालकास अटक

कोरोना नियमांतर्गत लोकांना जमवण्यास बंदी आहे. मात्र, नियमाचे उल्लंघन करत या नेत्यांनी धर्मवीर संभाजी महाराज चौकात सोमवारी (ता.२७ सप्टेंबर) मोठ्या प्रमाणात गर्दी जमवल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आठवड्यांपूर्वी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आंदोलन करत मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. भाजपच्या या आंदोलनानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी श्रीकांत देशमुख यांना जाब विचारत सोलापुरात येण्याचे आव्हान दिले होते.

Ranjit Naike Nimbalkar
अनिल परब चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर; म्हणाले, मी चुकीचे काही केले नाही

बरडे यांच्या आव्हानास भाजप नेत्यांनी प्रतिसाद देत श्रीकांत देशमुख यांनी सोलापुरातल्या धर्मवीर संभाजी महाराज चौकात शेकडो भाजप कार्यकर्ते घेऊन दाखल झाले होते. तसेच, देशमुख यांच्यासोबत यावेळी खासदार निंबाळकर आणि माजी मंत्री ढोबळे यांनी आंदोलनास हजेरी लावली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com