Solapur News : काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या भावाविरोधात आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल

संशयित आरोपी शंकर म्हेत्रे आणि गुरूशांत कोलाटी यांनी रेवणसिद्ध सोन्नद याच्याकडे ऐश्वर्या वॉटर प्लांटमध्ये केलेल्या अपहाराच्या पैशाची वेळोवेळी मागणी करून त्यास शिवीगाळ केली.
Shankar Mhetre
Shankar MhetreSarkarnama

अक्कलकोट (जि. सोलापूर) : एका चाळीस वर्षीय व्यक्तीकडे ऐश्वर्या वॉटर प्लांटमधील अपहार केलेल्या पैशाची मागणी करून शिवीगाळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) यांचे बंधू आणि काँग्रेसचे (Congress) अक्कलकोट तालुकाध्यक्ष शंकर सातलिंगप्पा म्हेत्रे (Shankar Mhetre) यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. आत्महत्येची घटना दुधनी येथे १० जुलै २०२२ रोजी घडली होती. (Case has been registered against Shankar Mhetre and one others in the case of suicide)

दुधनी येथे जुलै महिन्यात झालेल्या या घटनेची तक्रार तब्बल सहा महिन्यांनी देण्यात आली आहे. त्यानंतर म्हेत्रे यांच्यासह दोघांवर अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shankar Mhetre
Gram Panchayat Election : ‘तुमच्यामुळे माझा मुलगा सरपंच झाला नाही’ : पराभवाच्या रागातून कुटुंबाला जीवे मारण्यासाठी दिली सुपारी

रेवणसिद्ध मल्लीनाथ सोन्नद (वय ४०, रा. दुधनी, ता. अक्कलकोट) यांनी १० जुलै रोजी आत्महत्या केली हेाती. त्याबाबतची फिर्याद काशिनाथ भागेश यरंगल (रा. दुधनी, ता. अक्कलकोट) यांनी दिली आहे. संशयित आरोपींमध्ये शंकर सातलिंगप्पा म्हेत्रे, गुरूशांत कोलाटी (दोघेही, रा. दुधनी, ता. अक्कलकोट) यांचा समावेश आहे.

Shankar Mhetre
Terna Sugar Factory : तानाजी सावंतांची अमित देशमुखांना धोबीपछाड : ‘तेरणा’चा ताबा अखेर भैरवनाथ शुगरकडे!

याप्रकरणी सोन्नद यांच्या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार नसल्याचा जबाब या पूर्वी दिला होता. मात्र, मृत रेवणसिद्ध सोन्नद याच्या मित्राने ता.२ जानेवारी रोजी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून पोलिस निरीक्षक महेश स्वामी तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com