Solapur News : हिंदू गर्जना मोर्चात तलवार फिरवणे अंगलट; सोलापुरातील बड्या नेत्याच्या सुपुत्राविरोधात गुन्हा दाखल

मुळात संघ परिवाराने आयोजित केलेल्या मोर्चात राष्ट्रवादीच्या नेते महेश कोठे आणि त्यांचे पुत्र प्रथमेश कोठे यांनी सहभागी होण्यासंदर्भातच चर्चा सुरू आहे.
Prathamesh Kote
Prathamesh KoteSarkarnama

शिवाजी भोसले

सोलापूर : सोलापुरात (Solapur) तीन दिवसांपूर्वी हिंदू गर्जना मोर्चा निघाला होता, या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी काही बंधने घातली होती, तसे आदेश दिले होते. पण, त्या आदेशांचे उल्लंघन करणे येथील बहुचर्चित राष्ट्रवादीचे (NCP) नेते तथा माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kote) यांचे सुपुत्र नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या अंगलट आले आहे. मोर्चात नंगी तलवार फिरविण्याच्या स्टंटबाजमुळे प्रथमेश कोठे यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. (Case has been registered against Prathamesh Kote)

हे प्रकरण कोठे यांना अडचणीत आणणारे आहे. तथापि, या प्रकरणात प्रथमेश कोठे यांच्यावर कोणती कारवाई होणार, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. मुळात संघ परिवाराने आयोजित केलेल्या मोर्चात राष्ट्रवादीच्या नेते महेश कोठे आणि त्यांचे पुत्र प्रथमेश कोठे यांनी सहभागी होण्यासंदर्भातच चर्चा सुरू आहे.

Prathamesh Kote
Supreme Court Hearing : ठाकरे गटाची युक्तीवादात मोठी मागणी : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयानेच निर्णय घ्या

तीन दिवसांपूर्वी सोलापुरात संघ परिवाराने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आयोजित केलेल्या हिंदू गर्जना मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते, माजी महापौर महेश कोठे यांचा सहभाग सार्वत्रिक चर्चेचा विषय ठरला. याच मोर्चात सहभागी झालेले त्यांचे पुत्र, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे हे तलवार बाळगून हवेत फिरविल्याप्रकरणी अडचणीत आले आहेत.

फौजदार चावडी पोलिस ठाण्यात प्रथमेश कोठे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक विनोद व्हटकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रथमेश कोठे हे हिंदू गर्जना मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चा माणिक चौकात पोहोचला असता प्रथमेश कोठे यांनी मोर्चात लाल वेष्टनात गुंडाळून आणलेली तलवार हातात बाळगली आणि मोर्चेकऱ्यांच्या गर्दीमध्ये तलवार हवेत फिरविली. यात पोलिस प्रशासनाने दिलेल्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन झाले.

Prathamesh Kote
Supreme Court Hearing : बहुमत चाचणीचे राज्यपालांचे ते पत्र रद्दबातल ठरावा; सर्वकाही पूर्ववत होईल : ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद

शिंदेंशी संबंध कामी येऊ शकतात

माजी महापौर महेश कोठे हे सध्या राष्ट्रवादीत असले तरी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. सुपुत्र प्रथमेश कोठे यांच्यावर मोठी कारवाई पोलिस करू लागले तर महेश कोठे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पोलिस प्रशासनाला कारवाई न करण्याबद्दल रोखू शकतात, अशी चर्चाही सोलापूरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in