Maan News : आरक्षणाचे गाजर दाखवून मराठा, धनगर समाजाला सरकारने झुलवत ठेवले : नाना पटोले

Nana Patole श्री. पटोले यांनी येथील ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते विकास गोंजारी यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
Congress Leader Nana Patole
Congress Leader Nana Patolesarkarnama

-सल्लाउद्दीन चोपदार

Mhaswad News : सध्याच्या राज्य सरकारने मराठा Maratha व धनगर Dhangar समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून झुलवत ठेवले, अशी टीका करून कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यासह १६ आमदारही अपात्र ठरतील, असे मत व्यक्त केले.

श्री. पटोले यांनी येथील ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते विकास गोंजारी यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, माण तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील, दाऊद मुल्ला, नीलेश काटे आदी उपस्थित होते. श्री. पटोले म्हणाले, राज्यातील सरकार हे फसवे सरकार आहे. माण-खटाव तालुक्यांने नेहमीच काँग्रेस पक्षाची पाठराखण केली आहे.

माण तालुक्यात याच महिन्यात मी दुसऱ्यांदा आलो आहे. या दुष्काळी माण तालुक्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी भरघोस निधी दिला होता. यामुळेच माण तालुक्यातील सर्व सिंचन योजना मार्गी लागल्या आहेत. असे असतानाही येथील लोकप्रतिनिधी सध्या कोणत्या पक्षात आहेत, याचे सामान्य जनतेला काहीही देणे-घेणे नाही.

Congress Leader Nana Patole
Maan News : महादेव जानकरांचा करिष्मा; माणमधील सर्व विरोधक आणले एका व्यासपीठावर

ती कालही कॉँग्रेससोबत होती. आजही आहे अन् उद्याही राहतील, असा टोला श्री. पटोले यांनी आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore यांचे नाव घेता मारला. यापुढे माण-खटावमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना ताकद देणार असून, सर्वसामान्य कार्यकर्ता हीच कॉँग्रेसचे खरी ताकद आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत माण- खटावमध्ये काँग्रेसचाच आमदार निवडून येईल, असा विश्वास आमदार पटोले यांनी व्यक्त केला.

Congress Leader Nana Patole
Nana Patole News : आघाडीतील जागावाटप, मुख्यमंत्रीपदाबाबत पटोलेंचं मोठं विधान,''२०१४ मध्ये काँग्रेसला धोका...''

राज्यात महाविकास आघाडीमध्ये कोणताही बेबनाव नसल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, ‘‘आमची आघाडी ही भक्कम असून, यापुढील सर्व निवडणुका आम्ही एकत्रित लढून सध्याच्या राज्य सरकारला सत्तेतून खाली खेचू. याच सरकारने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मराठा व धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले. मात्र, सत्ता येताच त्यांनी आरक्षणाचा प्रश्न लटकवत ठेवत या समाजाची घोर फसवणूक केली.’’

Congress Leader Nana Patole
Maha Vikas Aghadi News: मोठी बातमी! काँग्रेस-राष्ट्रवादीनं पाठीत खंजीर खुपसला; महाविकास आघाडीतून ठाकरे गट पडला बाहेर

या वेळी स्नेहल जगताप यांच्या शिवसेना प्रवेशावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले, ‘‘स्नेहल जगताप यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आम्ही सांगितले होते, तरीही त्यांनी त्यांना आपल्या पक्षात घेतले आहे. भविष्यात जर त्यांनी शिवसेनेतून निवडणूक लढविली तर त्यांच्या विरोधात आमचा काँग्रेसचा उमेदवार उभा करणार आहे.’’

Congress Leader Nana Patole
Satara NCP : शरद पवारांचे साताऱ्यात जंगी स्वागत; युवकांकडून पुष्पवृष्टी आणि घोषणाबाजी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com