Bramhanand Padalkar and Gopichand Padalkar
Bramhanand Padalkar and Gopichand Padalkar Sarkarnama

Padalkar : गोपीचंद पडळकरांना दणका; भाऊ ब्रम्हानंद पडळकरांसह १०० जणांवर गुन्हा दाखल

Brahmanand Padalkar : मिरज शहरातील काही दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या साह्याने मध्यरात्री पाडण्यात आले.

Brahmanand Padalkar : सांगली जिल्ह्यातील मिरज शहरातील काही दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या साह्याने मध्यरात्री पाडण्यात आले. यामुळे येथे दोन गटात राडा झाल्याची घटना घडली. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकरांनी हे अतिक्रमण बेकायदेशीरपणे जागेचा ताबा घेण्याच्या उद्देशाने पाडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आता मोठी करवाई केली असून आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह तब्बल १०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पडळकरांना मोठा दणका बसला आहे.

मिरज शहरातील दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोअर्स, ट्रॅव्हल ऑफिस, एक घर, पान शॉप अशा दहा मिळकती मध्यरात्री जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आल्या. यामुळे मिरजमध्ये एकच खळबळ उडाली. तर हे अतिक्रमण हटवण्याला स्थानिकांनी विरोध केला असून ब्रह्मानंद पडळकर यांच्या विरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत.

Bramhanand Padalkar and Gopichand Padalkar
Cabinet expansion : शिरसाटांच्या मंत्रीपदाला मुहूर्त लागणार का ?

माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर काही आस्थापना पोकलेनने मध्यरात्री पाडण्यात येत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. मात्र पोलीस घटनास्थळी येताच ड्रायव्हर व इतर लोकं पळून गेले. पण तो पर्यंत दहा आस्थापने पाडण्यात आले होते. तर या आस्थापना धारकांपैकी एका व्यक्तीने तक्रार दिली असून विविध कलमांतर्गत ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह इतर १०० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे मिरज शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले या घटनेची पुढील चौकशी पोलीस करत आहेत. तसेच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ब्रह्मानंद पडळकर हे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे.

Bramhanand Padalkar and Gopichand Padalkar
Maharashtra Politics : '8 ते 10 दिवसात उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्के बसणार'

या प्रकरणावर गोपीचंद पडळकर म्हणाले?

तोडण्यात आलेले गाळे बेकायदा होते. त्यामुळे माझ्या भावाने काही चुकीचे काम केलेले नाही. कारण महापालिकेने रिमाईड नोटीस पाठवली होती. अतिक्रमण काढून घ्या, त्यानंतर रात्री हे अतिक्रमण काढलं आहे. त्यामुळे कुठलेही चुकीचे काम केलेले नाही, असं स्पष्टीकरण गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in