कऱ्हाडला ई-निविदेवरून ठेकेदारांना दमदाटी; तक्रार जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर

नवीन ठेकेदारांना New Contractors किंवा तुलनात्मक दर भरू इच्छिणाऱ्यांवरही अन्याय होत आहे. जिल्हा परिषदेच्या ZP सार्वजनिक बांधकाम PWD विभागाच्या ई-निविदात E Nivida अशी अट नाही.
Karad Palika
Karad Palikasarkarnama

कऱ्हाड : कराड पालिकेची विविध कामाचे ई-निविदा भरणाऱ्या सामान्य ठेकेदारांना दमदाटी केली जात आहे. ई-निविदेत स्थळ पाहणीची अट सक्तीची असूनही पालिकेचे अधिकारी स्थळ पहाणीला ठेकेदाराला वेळ व अहवालही देत नाहीत. त्या उलट कोणत्या ठेकेदाराने कोणता ठेका भरला, त्याची माहिती पालिकेतील मतलबी लोकांना दिली जाते. तीच लोक सामान्य ठेकेदाराला बोलावून तुम्ही टेंडर भरायचे नाही, अशी धमकी देत ठेकेदारावर दबाव आणत आहेत. त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी काही ठेकेदारांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

यामध्ये राजाराम गणपत शिंदे, दीपक शांताराम पवार व दिनकर लक्ष्मण पाटील व अन्य ठेकेदारांनी केलेल्या तक्रारीनुसार चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेसह राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे. कराड पालिकेने विविध कामांच्या शासनाने ई-निविदा काढल्या आहेत. संबंधित ठेकेदारांना तुलनात्मक निविदा भरता यावी, हा उद्देश आहे.

Karad Palika
माझी वसुंधरा पुरस्कारात कराड पालिका राज्यात दुसरी

मात्र, निविदा भरताना धन दाडग्यांचा दबाव येऊ नये, म्हणून गप्प बसावे लागते. पालिकेच्या बांधकाम व जलःनिस्सारण विभागाकडून कामाची ई-निविदा प्रसिध्द झाली आहे. त्यात निविदा भरण्यापूर्वी संबंधित ठेकेदाराने पालिका प्रतिनिधींसह कामाची स्थळ पाहणी करून तसा दाखला पालिकेकडून घ्यायचा आहे. मात्र, ही अट नसून मेख आहे. त्यामुळे ठेकेदार स्थळ पाहणीला संबंधित आधिकाऱ्यांची विनवणी करत आहेत. तरीही अधिकारी टाळाटाळ करतात.

Karad Palika
स्वच्छ सर्वेक्षणात कराड, पाचगणी देशात अव्वल; सात शहरांना 'थ्री स्टार' रॅकिंग

त्याउलट निविदा भरायला आलेल्या ठेकेदारांची माहिती पालिकेतील काही मतलबी लोकांना ते देत असून सामान्य ठेकेदाराला बोलावून तुम्ही या कामाची निविदा भरायची नाही. ते काम दुसऱ्याला दिले आहे, असा दबाव ठेकेदारावर आणत आहेत. त्यामुळे पालिका बदनाम होत आहे. पालिकेचे मुख्याधिकारीही बदनाम होत आहेत. नवीन ठेकेदारांना किंवा तुलनात्मक दर भरू इच्छिणाऱ्यांवरही अन्याय होत आहे.

Karad Palika
कराड पालिकेत काळ्या यादीची भिती दाखवून ठेकेदारांशी लोकप्रतिनिधींचे 'सेटलमेंट'

जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ई-निविदात अशी अट नाही. तरी पालिकेच्या कामासाठी तुलनात्मक दर यावेत, सर्व ठेकेदारांना विनादबाव निविदा भरता यावी म्हणून वरील अट सुचनेतून रद्द करावी. पालिकेची सुचना पारदर्शक कारभारासाठी पालिकेच्या फायदयासाठी आणि सर्व ठेकेदारांना विना दबाव ई-निविदा भरता यावी यासाठी आहे. त्याचा गांर्भीयांने विचार व्हावा, असे तक्रारीत ठेकेदारांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com