बैलगाडा शर्यत पुन्हा अडकली कायद्याच्या कचाट्यात; सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

bullock cart race : न्यायाधीश के एम जोसेफ यांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी घेण्यात येणार आहे.
bullock cart race , Latest News
bullock cart race , Latest Newssarkarnama

पिंपरी : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत आणि तमिळनाडूमधील जलीकट्टू या साहसी खेळासंबंधित कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.आता याच याचिकेवर उद्या (दि.२३ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायाधीश के एम जोसेफ यांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी घेण्यात येणार आहे. (bullock cart race , Latest News)

bullock cart race , Latest News
संभाजी भिडे नरमले.. महिला आयोगाला मागितली १० दिवसांची वेळ

तामिळनाडूमध्ये जानेवारीत जल्लीकट्टू या साहसी क्रीडा महोत्सव होत आहे.या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यत आणि जल्लीकट्टू या क्रीडाप्रकाराविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर तामिळनाडू सरकारच्यावतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याबाबत विनंती न्यायालयाकडे केली होती. यावेळी न्यायालयाने जानेवारीमध्ये जल्लीकट्टू असल्याने या प्रकरणात तात्काळ सुनावणी घेण्यात येईल,असे स्पष्ट सांगितले होते. त्याचवेळी याप्रकरणी वकिलांना अहवाल लवकर सादर करण्याचे निर्देश देखील दिले होते.त्यानंतर या प्रकरणावर आता 23 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

bullock cart race , Latest News
गांधी हत्येसाठी काँग्रेस मंत्र्यांच्या मेव्हण्यानेच पिस्तूल पुरवला; सावरकर-गांधींच्या पणतूंमध्ये जुंपली

केंद्र सरकारच्या आदेशानंतर ११ जुलै २०११ रोजी आदेशानुसार उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर (bullock cart race) बंदी आणली होती.त्यानंतर 20 एप्रिल 2012 रोजी राज्य सरकारने परिपत्रक काढून राज्यात बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात आल्याचे जाहीर केले होते.यानंतर सातत्याने बैलगाडाप्रेमींकडून बैलगाडा शर्यत सुरुवात करण्याबाबत आग्रही मागणी करण्यात येत होती.

तसेच पुंणे जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींकडून देखील या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत केंद्र सरकारकडे आग्रही भूमिका मांडण्यात आली होती.अखेर सर्वोच्च न्यायालयाने 16 डिसेंबर 2021 रोजी अटी व शर्थींसह बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली.यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जात आहे.

दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत आणि तामिळनाडूतील जल्लीकट्टू विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. यामुळे या सुनावणीकडे बैलगाडाप्रेमींसह आयोजक आणि मालकांचे देखील लक्ष लागलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com