Nagar Zilla Bank Srirampur Branch
Nagar Zilla Bank Srirampur BranchMahesh Malwe

नगर जिल्हा बँकेच्या शाखेत सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून सुटली गोळी : शेतकऱ्याचा मृत्यू

अशोक सहकारी कारखान्याच्या सुरक्षा रक्षकाच्या रायफलमधून अचानक झालेल्या फायरमुळे शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

महेश माळवे

श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) - अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सुरक्षा रक्षकाच्या रायफलमधून अचानक झालेल्या फायरमुळे शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. अहमदनगर जिल्हा बँकेच्या टाऊन शाखा, श्रीरामपूर येथे आज (ता. 30) दुपारी 12.45 वाजता ही घटना घडली. पैसे घेण्यासाठी हा सुरक्षारक्षक जिल्हा बँकेच्या शाखेत आला होता. ( Bullet fired from security guard's gun in ADCC Bank branch: Farmer lost his life )

श्रीरामपूर तालुका प्रगत बागायतदार संस्थेचे सभासद अजित विजय जोशी (रा. दत्त मंदिराजवळ, सार्वमत रोड, वार्ड नं. 7, श्रीरामपूर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील जिल्हा बँकेच्या टाऊन शाखेत रोजच्याप्रमाणे कॅश भरण्यासाठी अशोक सहकारी कारखान्याचे कर्मचारी सुरक्षारक्षक दशरथ कारभारी पुजारी (वय 57) यांच्यासह आले होते.

Nagar Zilla Bank Srirampur Branch
श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात उपनिरीक्षकास मारहाण : तिघांविरूध्द गुन्हा दाखल

इतर कर्मचारी कॅश भरणा करण्यासाठी बँकेत गेले. त्यावेळी पुजारी हे रायफल खांद्याला लावत असताना अचानक त्यांच्या रायफलमधून फायर झाले. त्याचवेळी बँकेत आपल्या कामकाजासाठी आलेले जोशी हे दुचाकी लावून उभे असतानाच रायफलमधून सुटलेली गोळी त्यांच्या डोक्यातून आरपार गेली. यामुळे त्यांचा मेंदू बाहेर फेकला जाऊन ते जागेवरच गतप्राण झाले.

Nagar Zilla Bank Srirampur Branch
लहू कानडेंची ससाणे गटावर अप्रत्यक्ष टीका : गद्दार म्हणणारे ढोंगी

गोळीबाराचा आवाज आल्यानंतर बँकेतील कर्मचारी व रस्त्यावरील नागरिकांनी बँकेच्या दिशेने धाव घेतली. यावेळी मोठ्याप्रमाणात गर्दी जमा झाली होती. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, शहर ठाण्याचे निरीक्षक संजय सानप फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेऊन गर्दी हटविली. रुग्णवाहिकेतून जोशी यांचा मृतदेह साखर कामगार रुग्णालयात हलविला. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com