BJP : शिवबंधन तोडत धैयशील कदमांनी हाती घेतले कमळ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांना भेटून त्यावेळी मी आपली खदखद मांडली होती. मात्र, न्याय मिळाला नाही Justice was not served.
Dhairyashil Kadam
Dhairyashil Kadamsarkarnama

औंध : कऱ्हाड उत्तरचे शिवसेनेचे नेते आणि वर्धन ॲग्रोचे अध्यक्ष धैर्यशील कदम यांनी काल मुंबईत शिवबंधन तोडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राहुल कुल यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, कऱ्हाड उत्तरमधील विकासकामांना गती देऊन धैर्यशील कदम यांना ताकद देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिली.

Dhairyashil Kadam
Dhule News: धुळे जिल्ह्यातून जयकुमार रावल,अमरिशभाई पटेल यांची संधी हुकली!

श्री. कदम यांनी २०१९ मध्ये शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवली होती. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे मतदारसंघाच्या विकासकामांना निधी मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, माजी सहकारमंत्री यांच्या दबावामुळे शिवसेनेने त्यांना वाऱ्यावर सोडले. विकासकामांच्या अनेक फाईल बाजूला टाकल्या.

Dhairyashil Kadam
Operation Lotus : केजरीवाल सरकार पाडण्यासाठी भाजप करणार ८०० कोटी खर्च ?

त्यामुळे सत्ता असतानाही कदम यांची कोंडी झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून त्यावेळी त्यांनी आपली खदखद मांडली होती. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही. राज्यात आता सरकार बदलले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष गोरे, खासदार निंबाळकर यांच्याशी कदम यांची जवळीक वाढली होती.

Dhairyashil Kadam
Aditya Thackeray | शेवटच्या दिवशीही शिवसेना भाजपा वाद थांबेना

मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता शिवबंधन तोडून श्री. कदम यांनी अखेर आज मुंबई येथे भाजप कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, रहिमतपूर नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते नीलेश माने यांच्यासह मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार आहे.

Dhairyashil Kadam
Maratha Reservation: एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

दरम्यान, धैर्यशील कदम यांच्या कामाची पद्धत आपल्याला माहिती आहे. अशा धाडसी नेतृत्वाला ताकद देऊन पुढील काळात मतदारसंघातील कामांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रवेशाच्या वेळी दिली.

Dhairyashil Kadam
`कदम खानदानाला राजकारणातून संपवायचं हे `मातोश्री`वर ठरलं होतं!`

विकासाचा बॅकलॉग भरून काढणार

कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अनेक विकासाची कामे रखडली आहेत. माजी पालकमंत्र्यांनी सत्तेच्या काळात आपल्या बगलबच्च्यांचा विकास साधला आहे. गट-तट बघून अनेक विकासकामे अडवण्याचे पाप केले आहे. मतदारसंघातील विकासकामांना गती देण्याबरोबर विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

-धैर्यशील कदम, अध्यक्ष, वर्धन अॅग्रो कारखाना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com