राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर थापल्या भाकऱ्या

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ( NCP ) आज (बुधवारी) अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालयांसमोर आंदोलने करण्यात आली.
Bread baked by NCP women workers in front of tehsil office
Bread baked by NCP women workers in front of tehsil officeSarkarnama

राहुरी ( अहमदनगर ) : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज (बुधवारी) जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालयांसमोर आंदोलने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.

राहुरी तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जागरण गोंधळ घालून, महिलांनी चुलीवर भाकऱ्या भाजून घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध केला. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य डॉ. उषा तनपुरे यांच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

Bread baked by NCP women workers in front of tehsil office
प्राजक्त तनपुरे आणि जयंत पाटील यांची विकासात्मक बाबींवर जुगलबंदी रंगली

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, नितीन बाफना, नगराध्यक्ष अनिल कासार, संतोष निकम, धनराज गाडे, प्रदीप सोडनर, धीरज पानसंबळ, डॉ. राजेंद्र बानकर, नवाज देशमुख, शहाजी ठाकूर, सूर्यकांत भुजाडी, सुनील अडसुरे, रवींद्र आढाव, सुरेश निमसे, मनीषा ओहोळ, अपर्णा ढमाळ, कविता हापसे, प्रकाश देठे, पांडू उदावंत उपस्थित होते.

उज्वला गॅस योजनेचे आमिष दाखवून गॅसची सबसिडी बंद केली. पेट्रोल, डिझेलचे भाव शंभरी पार गेल्याने महागाई गगनाला भिडली. शेतीमालाला मातीमोल भाव मिळत आहे. रासायनिक खते, बियाणे, पशुखाद्याचे दर प्रचंड वाढले आहेत. शेतकरी व सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत आहे. केंद्र सरकारचे महागाईवर नियंत्रण राहिले नाही. असे घणाघाती आरोप तालुकाध्यक्ष सोनवणे, विजय माळवदे व इतरांनी केला.

Bread baked by NCP women workers in front of tehsil office
पवार-विखे वादाला तरूणाई मैत्रीत बदलू पाहतेय...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरुद्ध निषेधाच्या घोषणा देऊन, इंधन दरवाढ कमी करावी. सामान्य जनतेला जीवन जगणे सुकर करावे. अशी मागणी केली. ॲड. राहुल शेटे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com