मुलगा विहानचा स्ट्रॉबेरीचा हट्ट अन्‌ माझी साताऱ्याला बदलीचा योगायोग.....

पश्चिम महाराष्ट्रात West Maharashtra जिल्हाधिकारी Collector म्हणून माझी पहिलीच बदली असून सातारा जिल्ह्यात Satara District काम करायची संधी मिळणे हे माझे भाग्य my luck आहे.
Shekhar Singh, Ruchesh Jayvanshi
Shekhar Singh, Ruchesh Jayvanshisarkarnama

सातारा : मुलगा विहान याने महाबळेश्वर मधील भिलार येथील स्ट्रॉबेरी शेतात जाऊन स्ट्रॉबेरी तोडण्याचा व खाण्याचा हट्ट धरला होता. त्यानुसार महिनाभरापूर्वी आम्ही महाबळेश्वरला पर्यटनासाठी आलो होतो. त्यावेळी आपली साताऱ्यात बदली होईल, असे मनात चुकूनही वाटले नव्हते. आज महिन्याभरातच सातारचा जिल्हाधिकारी म्हणून माझी बदली झाली, हा एक गंमतीशीर योगायोग असल्याचे साताऱ्याचे नुतन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी सांगितले.

साताऱ्याचे नवे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी आज मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून पदभार स्वीकारला. सूत्रे स्वीकारल्यानंतर जयवंशी यांनी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला. सातारा जिल्ह्यात होणारी ही बदली पूर्वनियोजित होती काय, या प्रश्नाला उत्तर देताना श्री. जयवंशी म्हणाले, अकोला येथे बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून मी एक वर्षे काम पाहिले आहे.

Shekhar Singh, Ruchesh Jayvanshi
उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडा पुरस्कार सातारा जिल्ह्याला जाहीर

जर माझ्या कामांत सातत्य व सक्षमता असेल तर शासन मला येथे आणखी तीन वर्षे कामाची संधी देईल. नाहीतर माझी पुन्हा बदली करेल. पण, माझा सहा वर्षाचा मुलगा विहान याने त्याच्या मित्राकडून महाबळेश्वरातील स्ट्रॉबेरीविषयी ऐकले होते. त्यानुसार त्यानेही भिलार येथील स्ट्रॉबेरीच्या शेतीत जाऊन स्ट्रॉबेरी तोडण्याचा व खाण्याचा हट्ट माझ्याकडे धरला होता.

Shekhar Singh, Ruchesh Jayvanshi
Maharashtra Rain News : पुण्यासह सातारा-कोल्हापूरला पुढील चार दिवस अतिवृष्टीचे !

त्यानिमित्ताने एकाच महिन्यापूर्वी मी महाबळेश्वरला पर्यटनासाठी आलो होतो. त्या वेळी सातारा जिल्ह्यात बदली होईल, असे मनात चुकूनही वाटले नव्हते. आज महिन्याभरातच सातारा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून माझी बदली झाली आहे, हा एक गंमतीशीर योगायोग आहे, असे ही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in