पवारांच्या कोर्टात होणार ‘विठ्ठल’चा निर्णय; भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून झाडाझडतीची शक्यता

कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालकेंसह सर्व संचालकांना बैठकीचे निमंत्रण दिले आहे.
Sharad Pawar-Vitthal Sugar factory
Sharad Pawar-Vitthal Sugar factorySarkarnama

पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळातील वाद आता ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या दरबारात गेला आहे. अंतर्गत वाद मिटवून कारखाना सुरु करता येईल का, या विषयावर उद्या खुद्द कारखान्याचे जन्मदाते शरद पवारांनीच संचालक मंडळाची पुण्यात बैठक बोलावली आहे. या बैठकीत पवार संचालकांना कोणता कानमंत्री देतात, याकडेच पंढरपुरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Board of Directors meeting in Pune in presence of Sharad Pawar regarding Vitthal factory)

दरम्यान, धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालकेंसह संचालक मंडळावर केलेल्या आरोपांसंदर्भात पवार काही बोलतात का, याचीही उत्सुकता लागली आहे.

पंढरपूरच्या राजकारणात आणि अर्थकारणात अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडणारा विठ्ठल सहकारी साखर कारखाना मागील काही वर्षांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. मागील वर्षीच्या हंगामात गाळप केलेल्या उसाची एफआरपीसह कामगार आणि तोडणी वाहतूकदारांचे पैसे अद्याप दिले नसल्याने कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. अशातच यंदाच्या गाळप हंगामाविषयी साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्याच्या संचालक मंडळाविषयी सभासदांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Sharad Pawar-Vitthal Sugar factory
एकनाथ खडसे लावणाऱ्या सीडीची गुलाबराव पाटलांनाही उत्सुकता!

सभासदांच्या उसाचे पैसे थकल्याने सध्या अध्यक्षासह संचालक मंडळाला लोकांसमोर फिरणेदेखील मुश्कील झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये काही संचालकांनी शरद पवार यांची भेट घेऊन साखर कारखाना सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी त्यांना विनंती केली होती. त्यानुसार शरद पवार यांनी उद्या दुपारी चार वाजता पुणे येथील साखर संकुलामध्ये कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालकेंसह सर्व संचालकांना बैठकीचे निमंत्रण दिले आहे. कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक करपे यांच्या माध्यमातून सर्व संचालकांना उद्याच्या बैठकीचे तसे निरोप देण्यात आले आहेत.

Sharad Pawar-Vitthal Sugar factory
पश्चिम महाराष्ट्र अंधारात बुडणार : महापूर येऊनही पिण्याचे पाणी न मिळण्याची शक्यता

बैठकीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार हे कारखान्याच्या संदर्भात कोणता निर्णय घेतात, याकडेच सभासदांचे लक्ष लागले आहे. अभिजित पाटील यांनी केलेल्या आरोप संदर्भात देखील पवार कारखान्याच्या संचालकांची कानउघाडणी करण्याची शक्यतादेखील व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com