बीएमडब्लूचा चक्काचूर : एअरबॅगमुळे वाचले आमदार संग्राम जगतापांसह पाच जणांचे प्राण

अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप ( Sangram Jagtap ) यांच्या वाहनाला आज पहाटे अपघात झाला.
sangram Jagtap | Accident
sangram Jagtap | Accident Sarkarnama

अहमदनगर - अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप ( Sangram Jagtap ) यांच्या वाहनाला आज पहाटे अपघात झाला. या भीषण अपघातात त्यांच्या अलिशान वाहनाचा चक्का चूर झाला मात्र दैवबलवत्तर व वाहनातील सर्व एअरबॅग उघडल्याने आमदार जगतापांसह पाचही जणांचा जीव वाचला. ( BMW shattered: Airbag saves five lives, including MLA Sangram Jagtap )

आमदार संग्राम जगताप आज पहाटे मंत्रालयातील कामा निमित्त मुंबईला निघाले होते. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील रसायनी गावाच्या परिसरात रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. या कामामुळे वाहतूक वळविण्यात आली आहे. ही वाहतूक वळविण्यासाठी बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास अंधार असल्याने पुण्याकडे निघालेल्या एसटी बस चालकाला उशिरा बॅरिकेटिंग दिसली. त्यामुळे त्याने अचानक बस वळविली. या बस वळविण्याच्या प्रयत्नात ही बस आमदार संग्राम जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारला समोरून धडकली.

sangram Jagtap | Accident
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात : थोडक्यात बचावले

ही धडक एवढी भीषण होती की, आमदार जगताप यांच्या वाहनाचा त्यात चक्का चूर झाला. त्यावेळी त्यांच्या वाहनात आमदार संग्राम जगताप, अनुप काळे, चालक व मुंबईतील दोन स्वीय सहाय्यक होते. मात्र अपघात होताच वाहनातील सुरक्षा साधन असलेल्या एअर बॅग उघडल्याने या वाहनातील कोणालाही दुखापत झाली नाही. नगरकरांचे प्रेम व आई-वडिलांच्या आशीर्वादाने वाचलो असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

ही घटना घडताच आमदार जगताप यांनी कुटुंबाला दुरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. तरीही आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थकांत चिंतेचा वातावरण आहे. आमदार संग्राम जगताप हे सुखरूप मुंबईत पोचले आहेत.

sangram Jagtap | Accident
पब्लिसीटीस्टंटला नव्हे मी शहर विकासाला महत्त्व देतो - आमदार संग्राम जगताप

ही दुसरी वेळ

आमदार संग्राम जगताप यांचा भीषण अपघात होण्याची ही दुसरी वेळ आहे. सुमारे 15 वर्षांपूर्वी अहमदनगर-करमाळा रस्त्यावर आमदार संग्राम जगताप यांच्या वाहनाचा अपघात झाला होता. त्यात ते बचावले होते. मात्र त्यांचा आत्तेभाऊ विशाल मुरकुटे यांचे या अपघातात निधन झाले होते. या वेळी दैवबलवत्तर व वाहनात पुरेशी सुरक्षा साधने असल्याने वाहनातील कोणालाही साधी जखमही झाली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com