Barshi Blast : बार्शीत फटाके कारखान्यात स्फोट; तीन महिलांचा होरपळून मृत्यू : आठवडे बाजार, दुपारच्या सुटीमुळे मोठी जीवितहानी टळली

स्फोटामुळे कारखान्यात काम करणाऱ्या महिलांच्या मृतदेह अक्षरशः उडून उसाच्या शेतात पडले होते.
Barshi Blast at Firecracker Factory
Barshi Blast at Firecracker Factory Sarkarnama

पांगरी (जि. सोलापूर) : बार्शी (Barshi) तालुक्यातील पांगरी हद्दीतील एका फटाकेनिर्मिती कारखान्यास अचानक आग लागून झालेल्या दुर्घटनेत तीन महिलांचा भाजून जागेवरच मृत्यू (Death) झाला, तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. नववर्षाच्या पहिल्या दिवशी आज (ता. १ जानेवारी) दुपारी २ वाजून ४७ मिनिटांनी ही दुर्दैवी घटना घडला. (Blast at Firecracker Factory in Barshi; Death of three women)

मृतापैकी दोन महिलांची ओळख पटली. कारखान्यात सतत स्फोट होत असल्याने इतर जखमींचा शोध घेताना अडचणी निर्माण होत होत्या. दरम्यान, कारखान्यात काम करणाऱ्या इतर मजुरांचा शोध सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Barshi Blast at Firecracker Factory
Jitendra Awhad : ‘ही तीन वर्षे कायम लक्षात राहतील : आणखी किती ठिकाणी अडकविले जाईल, सांगता येत नाही’

बार्शी तालुक्यातील पांगरी ते शिराळा रस्त्यावर पांगरीपासून तीन किमी अंतरावर युसूफ हाजी मणियार (रा. पांगरी, ता. बार्शी) यांच्या मालकीचा इंडियन फायर वर्क्स या नावाने फटाकेनिर्मितीचा कारखाना आहे. या कारखान्यात दैनंदिन ४० ते ५० कामगार काम करत असतात. मात्र आज पांगरी गावचा आठवडी बाजार असल्याने कारखान्यात नऊ महिला व कारखान्याबाहेर दोन पुरुष काम करत होते. दुपारी जेवणाच्या सुटीदरम्यान अचानक आग लागून कारखान्यात स्फोट सुरू झाले. या घटनेत तीन महिलांचा मृत्यू तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या.

Barshi Blast at Firecracker Factory
मोठी बातमी : आमदार संजय शिरसाठ यांची मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी अन्‌ सत्तारांच्या आरोपांची चर्चा...

स्फोटाचा आवाज व धुराचे लोट दहा किलो मीटर अंतरावरून आगीचे लोट दिसून येत होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पांगरी पंचक्रोशीतील असंख्य लोक घटनास्थळी दाखल झाल्याने जत्रेचे स्वरूप आले होते. त्यामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. आगी आटोक्यात आणण्यासाठी बार्शी, उस्मानाबाद, कुर्डुवाडी येथील अग्निशमन व रुग्णवाहिका मदत कार्यास दाखल झाल्या होत्या. येथील कारखान्यात वालवड, उक्कडगाव, पांगरी, चारे, पाथरी येथील महिला मजूर कामाला येतात.

Barshi Blast at Firecracker Factory
Abdul Sattar : माझ्याविरोधात कट रचणाऱ्या नेत्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली : सत्तारांचे मोठे विधान

सूमन उर्फ सुमित्रा ज्ञानोबा जाधवर (वय ५६, रा. वालवड, ता. बार्शी), गंगाबाई मारूती सांगळे (वय ५०, रा. उक्कडगाव) अशी ओळख पटलेल्या मृत महिलांची नावे आहेत. तर एक महिलेची ओळख पटलेली नव्हती. कारखान्यात सतत स्फोट होत असल्याने इतर जखमींचा शोध घेताना अडचणी निर्माण होत होत्या. कौशल्या सुखदेव बगाडे (वय ३०, रा. पांगरी) मोनिका संतोष भालेराव (वय ३० रा. वालवड) या दोन जखमींना उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. शकुंतला सुहास कांबळे (वय ३०, रा. पांगरी) या किरकोळ जखमी झाल्या असून भेदरलेल्या अवस्थेत त्यांच्यावर पांगरी ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Barshi Blast at Firecracker Factory
Congress : धवलसिंह मोहिते पाटलांनी जपला आजोबांच्या दोस्तीचा वसा; मंगळवेढा काँग्रेसची धुरा सोपवली कट्टर समर्थकाकडे

घटनास्थळाला आमद राजेंद्र राऊत, जिल्हा पोलिस प्रमुख शिरीष सरदेशपांडे, तहसीलदार सुनील शेरखाने, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल, पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ खुने, महारुद्र परजणे, ज्ञानेश्वर उदार आदींनी भेट देऊन मदतकार्य केले.

Barshi Blast at Firecracker Factory
Shinde Group News : शिंदे गटातील धूसफूस वाढली : सत्तारांनी माझ्याशी बोलायला हवे होते; वरिष्ठ मंत्र्याने सुनावले

मृतदेह पडले उडून शेतात

फटाके निर्मितीच्या या कारखान्यातील स्फोटाची तीव्रता प्रचंड भीषण होती. स्फोटामुळे कारखान्यात काम करणाऱ्या महिलांच्या मृतदेह अक्षरशः उडून उसाच्या शेतात पडले होते. घटनेतील जखमी महिला तडफडत होत्या. मात्र, त्यांना तासभर कोणतीच मदत मिळाली नसल्याचे घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. वेळेत मदत मिळाली असतील तर काहींना वाचविण्यात यश आले असते गावकऱ्यांनी सांगितले. मृत्यूच्या आकड्यांबाबत प्रशासनाने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in