Satara News : कामे रखडवणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका... उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale खासदार उदयनराजे भोसले यांनी आज शाहूपुरी, शाहूनगरसह हद्दवाढीनंतर पालिकेत आलेल्‍या विस्‍तारीत भागातील विकासकामांची पाहणी केली.
MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosalesarkarnama

Udayanraje Bhosale News : सातारा पालिकेने नियोजित केलेली विकासकामे पावसाळ्यापुर्वी संपली पाहिजेत. ही कामे सुरु आहेत की बंद आहेत, हे पाहण्‍यासाठी आम्‍ही फिरत आहोत. ही कामे मुदतीत पूर्ण न झाल्‍यास नागरीकांच्‍या त्रासात भर पडू शकते. यामुळे कामे दिलेल्‍या मुदतीत पूर्ण झालीच पाहिजेत. ठेकेदार कोणीही असू, त्‍यांना राजाश्रय असू द्या. काम वेळेत सुरु करुन मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अशा सुचना खासदार उदयनराजे भोसले यांनी आज केल्‍या.

खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी आज शाहूपुरी, शाहूनगरसह हद्दवाढीनंतर पालिकेत Satara Palika आलेल्‍या विस्‍तारीत भागातील विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्‍यांच्‍यासोबत माजी उपाध्‍यक्ष मनोज शेंडे, ॲड.दत्ता बनकर, वसंत लेवे, संग्राम बर्गे Sangram Barge, पालिका अधिकारी तसेच नागरीक उपस्‍थित होते.

कामांची पाहणी केल्‍यानंतर उदयनराजे भोसले म्‍हणाले, राजकारण आम्‍ही कधी केले नाही आणि करणारही नाही. नागरीकांच्‍या सुविधेसाठीची कामे प्राधान्‍याने पुर्ण होणे आवश्‍‍यक आहे. ठेकेदाराला त्‍यासाठी योग्‍य त्‍या सुचना करा. कोणताही ठेकेदार असू द्या. त्‍याला मी नाव घेवून मोठ करणार नाही.

MP Udayanraje Bhosale
Satara News : कास अनाधिकृत बांधकामे : हरित न्यायाधिकरणांचे जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश...

तुमच्‍या अडचणी काहीही असू द्या. काम पुर्ण झालेच पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. काम मुदतीत सुरु न करणाऱ्या तसेच काम मुदतीत संपलेच पाहिजे. कामे न झाल्‍यामुळे त्रास झाल्‍यास नागरीकांना त्‍या ठेकेदाराच्‍या घरी पाठवणार असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

तुमच्‍याकडे एवढे पैसे आहेत, तुम्‍ही मोठे झालात, तुम्‍हाला एवढा मोठा राजाश्रय आहे, तर करा ना कामे पुर्ण, अशा शब्‍दात उदयनराजेंनी नाव न घेता ठेकेदार आणि त्‍यांची पाठराखण करणाऱ्यांवर टिकाही केली.

MP Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosle : उदयनराजेंनी पालिका प्रशासनास फटकारले; म्हणाले, "अशुद्ध पाणीपुरवठा..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com