Shankarrao Gadakh
Shankarrao GadakhSarkarnama

भाजपच्या वरुडे बंधूंचा गडाख गटात प्रवेश

भाजपचे वरुडे बंधू आणि मित्र मंडळाने माजी मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) गटात प्रवेश केला आहे.

Shankarrao Gadakh : माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे जवळचे नातेवाईक व मागील दोन विधानसभा निवडणुकीत 'भाजप' च्या प्रचाराची धुरा संभाळणारे खुपटी येथील वरुडे बंधू आणि मित्र मंडळाने माजी मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) गटात प्रवेश केला आहे. हा प्रवेश गडाख गटाची बाजू मजबूत करणारा असल्याने सोनईकर सुखावले आहेत.

राजकीय डावपेच व निवडणुकीतील व्यूहरचनेत तरबेज असलेले खुपटी येथील बाळासाहेब वरुडे, चांगदेव वरुडे, नामदेव वरुडे व शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी आज माजी आमदार मुरकुटे गटाला सोडचिठ्ठी देवून माजी मंत्री गडाख गटात प्रवेश केला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नेवासे नगरपंचायत व तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर मुरकुटे गटाची गळती थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र सहा महिन्यापासून पाहण्यास मिळत आहे.

Shankarrao Gadakh
Shivsena News : बबनराव घोलप म्हणाले, शंकरराव गडाख अपक्ष, त्यांचा शिवसेनेला पाठिंबा...

प्रवरानदीच्या काठावर असलेल्या खुपटी गावात झालेल्या कार्यक्रमात वरुडे यांनी माजी आमदार मुरकुटे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत गाव व तालुक्यातील विकास कामासाठी आम्ही गडाखांच्या पाठिशी उभा राहिलो असे नामदेव वरुडे यांनी सांगितले.यावेळी मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडुबाळ कर्डिले, माजी उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे, विक्रम चौधरी, संभाजीराव कार्ले, सरपंच गोरख तनपुरे, अशोक चौधरी उपस्थित होते.

Shankarrao Gadakh
सुजय विखेंचा जवळचा कार्यकर्ता शंकरराव गडाख, औटी यांनी फोडला...

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या देवगावातील सेवा संस्थेत गडाख गटाचा झेंडा लागला. ग्रामपंचायतीचे उपसरपंच व काही सदस्य गडाख गटात आले. मुरकुटे यांचे पुतणे अजित मुरकुटेसह देडगाव, कुकाणे व परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी गडाख गटात प्रवेश केल्याने मुरकुटे हतबल झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com