चिठ्ठीने भाजपला तारले; महापौर, उपमहापौरपद गमावल्यानंतर सभापतिपदे राखली

दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी आठ मते मिळाली.
Gitanjali Dhope-Patil
Gitanjali Dhope-Patil Sarkarnama

सांगली : सांगली महापालिकेची महिला बालकल्याण समिती चिठ्ठीने भाजपकडेच राहिली, त्यामुळे गीतांजली ढोपे पाटील यांना सलग दुसऱ्यांदा सभापतिपदाची संधी मिळाली. समाज कल्याण समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने माघार घेतल्याने भाजपचे सुब्राव मद्रासी बिनविरोध विजयी झाले. (BJP's Gitanjali Dhope-Patil won election post of sabhapati in Sangli Municipal Corporation)

महापालिकेच्या महिला बालकल्याण आणि समाज कल्याण समितीच्या सभापती निवडी आज झाल्या. महापालिकेतील सत्ता गमावल्यानंतर भाजपने सावध पवित्रा घेत गेल्या महिन्यात स्थायी समिती राखण्यात यश मिळवले. त्यानंतर आता महिला बालकल्याण आणि समाज कल्याण या समित्याही आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले आहे.

महिला बालकल्याण समितीमध्ये भाजपचे नऊ, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सात सदस्य आहेत. भाजपकडून गीतांजली ढोपे पाटील यांना सलग दुसऱ्यांदा भाजपने संधी दिली, तर काँग्रेस-आघाडीकडून काँग्रेसच्या शुभांगी साळुंखे यांची उमेदवारी होती. मात्र महापौर निवडीवेळी काँग्रेस आघाडीला सहकार्य करणाऱ्या भाजपच्या नसीमा नाईक यांनी या वेळीही आघाडीलाच साथ दिली. त्यामुळे ढोपे-पाटील आणि साळुंखे या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी आठ मते मिळाली. त्यामुळे पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी चिठ्ठी टाकून सभापती निवडण्याचा निर्णय घेतला. यात गीतांजली ढोपे-पाटील यांचे नाव निघाल्याने त्यांना दुसऱ्यांदा सभापती होण्याची संधी मिळाली.

Gitanjali Dhope-Patil
राष्ट्रवादीच्या नाराज पदाधिकाऱ्यांवर भाजप नेत्यांचा ‘वॉच’

समाज कल्याण सभापती निवडीत भाजपचे उमेदवार सुबराव मद्रासी यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात होते. या समितीमध्ये भाजपचे सात, राष्ट्रवादीचे तीन तर काँग्रेसचे एक असे अकरा सदस्य आहेत. भाजपच्या सदस्यांमध्ये महापौर निवडीवेळी फुटलेले आनंदा देवमाने आणि स्नेहल सावंत यांचा समावेश होता. मात्र, राष्ट्रवादीचे उमेदवार योगेंद्र थोरात यांनी आपली उमेदवारी माघार घेतली, त्यामुळे सुबराव मद्रास यांची बिनविरोध निवड झाली. भाजपचे नेते शेखर इनामदार, दिनकर पाटील, दीपक शिंदे, विनायक सिंहासने, निरंजन आवटी यांनी नूतन सभापतींचा सत्कार केला. या वेळी नगरसेवक धीरज सूर्यवंशी, भारती दिगडे, दीपक माने, अविनाश मोहिते आदी उपस्थित होते.

Gitanjali Dhope-Patil
दिलीप मोहितेंचा शिवसेनेला दुसरा दणका : राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सेनेचे बंडखोर बनले उपसभापती

...तर फुटीरांवरील कारवाई थांबवणार : शेखर इनामदार

शेखर इनामदार म्हणाले, स्थायी समितीसोबत महिला, बालकल्याण व समाजकल्याण सभापतिपदे भाजपला मिळाली. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने खेळ केला. मात्र नियती आमच्या बाजूने होती. महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काही सदस्य फुटले होते. मात्र समाजकल्याण सभापतिपदाच्या निवडणुकीत आनंदा देवमाने स्वगृही आले. गेलेली पाखरे परत आली तरी आम्ही त्यांचे स्वागतच करू. शिवाय त्यांच्यावरील कारवाईही स्थगित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय भविष्यात देखील असे चमत्कार घडतील, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in