भाजपचं ठरलं : कोल्हापूर उत्तरमधून लढणार; फडणवीस दिल्लीतून उमेदवार जाहीर करणार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाच्या नेत्यांची बुधवारी (ता. १६ मार्च) रात्री चर्चा झाली.
भाजपचं ठरलं : कोल्हापूर उत्तरमधून लढणार; फडणवीस दिल्लीतून उमेदवार जाहीर करणार
BJP Leader MeetingSarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पक्षाकडून हालचालींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाच्या नेत्यांची बुधवारी (ता. १६ मार्च) रात्री चर्चा झाली. इच्छुकांची यादी माजी खासदार धनंजय महाडिक यांनी फडणवीस यांच्याकडे सोपवली असून ‘कोल्हापूर उत्तर’च्या उमेदवाराची घोषणा दिल्लीतून होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (BJP's discussion in Mumbai on the name of the candidate for Kolhapur North by-election)

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून (ता. १७ मार्च) सुरुवात झाली असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत २४ मार्च भरण्याची आहे. मतदान १२ एप्रिल रोजी होणार असून १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.

BJP Leader Meeting
पुन्हा राजकारण तापणार; देशमुखांवरील वसुलीच्या आरोपांचा आजच होणार सोक्षमोक्ष

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात मुंबईत विरोधी पक्षनेते फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, भाजपचे प्रवक्ते धनंजय महाडिक आदी उपस्थित होते. या बैठकीत पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार कोण उमेदवार द्यायचा, या अनुषंगाने चर्चा झाली. निवडून येण्याची क्षमता, संपर्क आणि इच्छुकांची तयारी याचाही आढावा घेण्यात आला.

BJP Leader Meeting
मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब होताच सावंतांना पहिली आठवण पर्रीकरांची!

भारतीय जनता पक्षाकडे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव, माजी नगरसेवक सत्यजित कदम, अजित ठाणेकर, दौलत देसाई, सचिन तोडकर आदींनी उमेदवारीची मागणी केलेली आहे. पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. महाडिक यांनी इच्छुकांची यादी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिली आहे. ती यादी घेऊन फडणवीस हे संसदीय मंडळाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे ‘कोल्हापूर उत्तर’च्या भाजप उमेदवाराची घोषणा दिल्लीतूनच होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोल्हापूर उत्तरची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी काँग्रेसकडून विशेषतः पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून प्रयत्न चालवले जात आहेत. त्यासाठी ते फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. निवडणूक लागलीच तर काँग्रेसकडून (स्व.) चंद्रकांत जाधव यांच्या घरातच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, महाआघाडीतील शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांकडून निवडणूक लढवण्याची भाषा केली जात आहे. त्यामुळे शिवसेना नेतृत्वाची भूमिका काय राहणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in