सांगलीमध्ये राष्ट्रवादीनेच केला काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम; भाजपला फायदा

Sangli Municipal Corporation : महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी भाजपचे (BJP) धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली आहे.
Dheeraj Suryavanshi
Dheeraj Suryavanshisarkarnama

सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी भाजपचे (BJP) धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी (NCP) आघाडीचे संतोष पाटील यांचा त्यांनी ९ विरुध्द ५ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीचे पवित्रा केरीपाळे व संगीता हारगे हे दोन सदस्य गैरहजर राहिले. त्यामुळे आघाडीच्या (MahaVikas Aghadi) पाटील यांना पराभव झाला. महापौर, उपमहापौर निवडीवेळी राष्ट्रवादीने जे पेरल, तेच उगवले, असा टोला धीरज सूर्यवंशी यांनी लगावला.

महापालिकेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात स्थायी समितीच्या सभापती पदासाठी निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी होते. भाजपकडून धीरज सुर्यवंशी तर आघाडीकडून फिरोज पठाण व संतोष पाटील यांचे अर्ज दाखल झाले होते. आघाडीच्या पठाण यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सूर्यवंशी व पाटील यांच्यामध्ये थेट लढत झाली. समितीत भाजपचे ९ काँग्रेसचे ४ तर राष्ट्रवादीचे ३ सदस्य आहेत.

Dheeraj Suryavanshi
वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ : उद्योगमंत्री सामंतांचा विश्वास

प्रत्यक्ष मतदानावेळी राष्ट्रवादीचे संगीता हारगे व पवित्रा केरीपाळे हे दोन सदस्य गैरहजर राहिले. केवळ डॉ. नर्गिस सय्यद सभागृहात उपस्थित होत्या. भाजपचे ९ तर काँग्रेसचे सर्वच्या सर्व ४ सदस्य उपस्थित होते. भाजपच्या सूर्यवंशी यांना ९ तर आघाडीच्या पाटील यांना केवळ ५ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी डुडी यांनी सूर्यवंशी यांना विजयी घोषीत केले.

सूर्यवंशी समर्थकानी गुलालाची उधळण व फाटक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. सूर्यवंशी यांची संपूर्ण सांगली शहरातून मिरवणूक काढली. आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, सभागृह नेते विनायक सिंहासने, सुरेश आवटी यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या.

दरम्यान, हा पक्षाचा विजय असल्याचे सांगत सूर्यवंशी म्हणाले, स्थायी समितीच्या सभापती पदाची मिळालेल्या संधीचे सोने करु जे काम पाच वर्षात झाले नाही, ते यापुढच्या वर्षभराच्या काळात करू पारदर्शक कारभार करत सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहराचा समतोल विकास करु. प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार म्हणाले, विरोधकांनी पक्षात तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र सदस्य एकसंघ राहिले.

पराभवानंतर विरोधी पक्षनेते संजय मेढे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधळा. राष्ट्रवादीने दगा दिला असे सांगत मेडे म्हणाले, भाजपचे दोन सदस्य कॉंग्रेसच्या संपर्कात होते. मात्र, राष्ट्रवादीचे धोका दिला. त्यांचे दोन सदस्य गैरहजर राहिले. त्यांच्या नेत्यांचे सदस्यांवर वचक नसलयाचे स्पष्ट झाले. महापौरांसह महत्वाचे पदाधिकारी निवडणुकीपासून दूर राहिले. परिणामी पराभव झाला. सत्तेशिवाय राहू शकत नाही, हे राष्ट्रवादीने सिध्द केले, असा आरोप त्यांनी केला. याऊट कॉंग्रेसचे सदस्य एकसंघ राहिले, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान म्हणाले, समितीमध्ये राष्ट्रवादीचे तीन सदस्य आहेत. तिन्ही सदस्यांशी चर्चा झाली होती. कॉंग्रेसला पाठींबाही दिला होता. मात्र, पवित्रा केरीपाळे व संगिता हारगे गैरहजर राहिल्या. केरीपाळे दोन दिवसांपासून संपर्कातच नव्हत्या. त्यांच्या दोन्ही मुलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची फोन उचलला नाही हारगे यांच्याशी संपर्क झाला होता. त्यांनी सभागृहात येत असल्याचा निरोपही दिला होता. मात्र, त्या आल्या नाहीत. दोन सदस्य का गैरहजर राहिले याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे. याबाबतचा अहवाल देशाध्यक्ष जयंत पाटील यांना देणार आहोत. त्यांच्याशी चर्चा करून गैरहजर राहणाऱ्या सदस्यांवर कारवाईचा निर्णय घेतला जाईल.

Dheeraj Suryavanshi
Vedanta Foxconn|पण त्याचवेळी आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली..; सुभाष देसाईंनी उघडले पत्ते

जे पेरल, तेच उगवलं

धीरज सूर्यवंशी यांना महापौर पदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. त्याचे शल्य त्यांच्या मनात होते. विजयानंतर त्यांनी जे पेरत तेच उगवते असे म्हणत राष्ट्रवादीच्या कारभाराचे वाभाडे काढले. सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन पारदर्शक काम करू तिन्ही शहरांचा समतोल विकास करु. राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणू. पाच वर्षाचे काम वर्षभरात करु अशी ग्वाही दिली.

सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीमुळे आघाडीच्या उमेदवाराचा पराभव होतोय हे लक्षात आल्यानंतर दिल्ली दौऱ्यावर असलेल्या महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांनी कातडी बचाव धोरण स्विकारले. गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्याद्वारे आघाडीचे उमेदवार संतोष पाटील यांना माघार घेण्याची सूचना केली. मात्र, पाटील यांनी महापौरांचा डाव ओळखत त्यांची सूचना डावलली. त्यामुळे राष्ट्रवादीचे पितळ उघडे पडले. राष्ट्रवादीच्या दग्यामुळेच कॉंग्रेसचा पराभव झाला, हे स्पष्ट झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com