जयंत पाटलांचा काँग्रेसला धक्का; सांगलीत स्थायी समिती अध्यक्षपद भाजपकडे

भाजपने (BJP) महाविकास आघाडीला धक्का देत स्थायी समिती अध्यक्षपद खेचून आणले आहे.
Sangli Municipal Corporation
Sangli Municipal Corporationsarkarnama

सांगली : राज्यातील सत्ता बदलाचा परिणाम सांगली महापालिकेत दिसला आहे. भाजपने (BJP) महाविकास आघाडीला धक्का देत स्थायी समिती अध्यक्षपद खेचून आणले आहे. यामुळे आता आघाडीत आरोप-प्रत्योरोपांचे राजकारण रंगले आहे.

सांगली महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. असे असतानाही भाजपने अध्यक्षपद मिळवल्यामुळे आता दोन्ही काँग्रेसमध्येच जुंपली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अंतर्गत कुरबुरीमुळे भाजपला फायदा झाला आहे. राष्ट्रवादीची मते फुटल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

Sangli Municipal Corporation
Vedanta Foxconn|पण त्याचवेळी आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली..; सुभाष देसाईंनी उघडले पत्ते

महाविकास आघाडीचे सरकार असताना महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर झाला होता. मात्र, आज झालेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीची दोन मते गैरहजर होती. भाजप उमेदवाराला ९ मते तर काँग्रेस उमेदवाराला ५ मते मिळाली आहेत.

काँग्रेसचे उमेदवार संतोष पाटील यांचा परवाभव झाला आहे. त्यांनी राष्ट्रवादीने धोका दिल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीची मते फुटल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भाजपचे धीरज सुर्यवंशी स्थायी समितीचे नवे अध्यक्ष झाले आहेत. यामुळे सांगतील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

Sangli Municipal Corporation
वेदांता प्रकल्प जाण्याला महाविकास आघाडी सरकारच जबाबदार ; दानवेंनी हात झटकले..

दीड वर्षांपूर्वी सांगली महापालिकेत भाजपची सत्ता असताना त्यांचे पाच नगरसेवक फोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपली सत्ता आणली होती. फक्त 14 नगरसेवक असताना राष्ट्रवादीचा महापौर काँग्रेसच्या पाठिंबामुळे झाला. त्याचवेळी स्थायी समिती काँग्रेसला देण्याचा करार झाला होता. मात्र, आज राष्ट्रवादीने गैरहजर राहून काँग्रेसला तोंडघशी पाडले आहे. त्यामुळे जयंत पाटील (Jayant Patip) यांच्या बद्दल काँग्रेसमध्ये नाराजी उफाळून येऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in