जयकुमार गोरेंवर भाजपची मोठी जबाबदारी; साताऱ्यात दिली ताकद

आगामी जिल्हा परिषद ZP, पंचायत समिती Panchayat Samiti, पालिका Palika व बाजार समितींच्या निवडणूका Election डोळ्यासमोर ठेऊन जिल्ह्यात पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रथमच एका आमदाराकडे जिल्हाध्यक्षपदाची धूरा भाजपने दिली आहे.
Jaykumar Gore, Vikram Pawaskar
Jaykumar Gore, Vikram Pawaskarsarkarnama

सातारा : भारतीय जनता पक्षाचे सातारचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांना प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सचिवपदी विद्यमान जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सातारा जिल्हाध्यक्षपदी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबतची घोषणा सोमवारी केली.

Jaykumar Gore, Vikram Pawaskar
देशमुखांची संपत्ती आता रडारवर...जयकुमार गोरेंचा इशारा

मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लीगल सेलचे महासचिव अखिलेश चौबे यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंग, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय या वेळी उपस्थित होते.

Jaykumar Gore, Vikram Pawaskar
एमआयडीसी पळवून नेणाऱ्यांचा कट जयकुमार गोरे हाणून पाडणार...

भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्ह्यात एक खासदार व दोन आमदार आहेत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका व बाजार समितींच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन जिल्ह्यात पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रथमच एका आमदाराकडे जिल्हाध्यक्षपदाची धूरा भाजपने दिली आहे. त्यानुसार माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. तसेच विद्यमान अध्यक्ष विक्रम पावसकर यांना प्रदेशवर संधी देताना त्यांना प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली आहे. आमदार गोरेंच्या या निवडीमुळे जिल्हा भाजपमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com