नाना पटोलेंच्या प्रतिमेस मारले भाजपने जोडे

नाना पटोले Nana patole यांना तातडीने अटक करावी, अन्यथा भारतीय जनता पक्षाचे BJP कार्यकर्ते त्यांना त्यांची जागा दाखवतील आणि होणाऱ्या परिणामास महाविकास आघाडी Maha vikas aghadi जबाबदार असेल असे त्यांनी स्पष्ट केले.
BJP Agitiation
BJP AgitiationPramod Ingale, satara

सातारा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. याचा निषेध नोंदवत ते दारूड्या गावगुंडासारखे बोलत आहेत. त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी करत साताऱ्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पटोले यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस 'जोडे मारो' आंदोलन केले.

नाना पटोलेंविरोधात घोषणाबाजी करत भाजपच्या साताऱ्यातील पदाधिकाऱ्यांनी आज आक्रमक होऊन पोवईनाका येथे भाजपचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत नाना पटोलेंच्या प्रतिकात्मक प्रतिमेस 'जोडे मारो' आंदोलन केले. यावेळी भाजपचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी म्हणाले, नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारहाण करण्याची धमकी दिली आहे. हा प्रकार अंगलट आल्यानंतर त्यांनी आपण पंतप्रधान नव्हे तर एका गावगुंडाबद्दल बोलल्याची सारवासारव केली.

BJP Agitiation
Video: नाना पाटोलेंविरोधात भाजपचं आंदोलन, मोदींविरोधात केलेल्या वक्तव्यावर आक्रमक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एका दारुड्या गावगुंडासारखे बोलत आहेत, हे धक्कादायक आहे. आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते या प्रकाराचा निषेध करतो. मोदी आडनावावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या घाणेरड्या टिप्पणीमुळे त्यांना न्यायालयासमोर जाब द्यावा लागला. नाना पटोलेही त्यांच्या नेत्याच्या मार्गावरून चालले आहेत. पटोले यांनी कारवाईला तयार रहावे, नंतर 'तो मी नव्हेच' असा पळपुटेपणा करू नये, असा इशारा त्यांनी दिला.

BJP Agitiation
देशात लाॅकडाऊन लागणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संकेत,पाहा व्हिडिओ

नाना पटोले यांना तातडीने अटक करावी, अन्यथा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांना त्यांची जागा दाखवतील आणि होणाऱ्या परिणामास महाविकास आघाडी जबाबदार असेल असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा चिटणीस विजय गाढवे, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, तालुका सरचिटणीस गणेश पालखे, युवा मोर्च्या जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे, उद्योजक आघाडी जिल्हाध्यक्ष निलेश शहा, आप्पा कदम, विकास बनकर, चंदन घोडके, वैशाली टंकसाळे, प्रशांत जोशी, रवी आपटे, रीना भणगे, मोनाली पवार, वनिता पवार, मनीषा जाधव, विक्रम बोराटे, प्रकाशकाका शहाणे, अविनाश खार्शिकर, किरण माने , पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com