पुणे विद्यापीठात भाजपच्या पॅनलला राष्ट्रवादीचे आव्हान

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत भाजपच्या विद्यापीठ विकास मंचला राष्ट्रवादीने आव्हान दिले आहे.
BJP-NCP
BJP-NCPSarkarnama

अशोक निंबाळकर

BJP Vs NCP : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत भाजपच्या विद्यापीठ विकास मंचला राष्ट्रवादीने आव्हान दिले आहे. युवा सेनाही त्यांच्यासोबत गेल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. आज पदवीधर प्रवर्गासाठी अर्ज माघारीची मुदत होती. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले.

नोंदणीकृत पदवीधरांमधून विद्यापीठाच्या अधिसभेवर दहा सदस्य निवडून दिले जाणार आहेत. संस्थाचालक प्रतिनिधी अशा विविध गटातून सदस्य निवडले जाणार आहेत. त्यासाठी टप्प्याटप्प्याने उमेदवारी अर्ज भरून घेतले जात आहेत. पदवीधरमध्ये दहा जागांपैकी पाच जागा खुल्या वर्गासाठी आहेत, तर पाच जागा आरक्षित जागांसाठी आहेत. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी २२ नोव्हेंबर रोजी होईल.

BJP-NCP
औरंगाबादच्या पाण्यासाठी २०० कोटी अन् क्रिडा विद्यापीठ; मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

विद्यापीठ विकास मंच या पॅनलचे नेतृत्व राजेंद्र विखे पाटील, पुण्याचे गजानन एकबोटे, नाशिकचे अपूर्व हिरे हे करीत आहेत, तर राष्ट्रवादीचा पॅनल अभिषेक बोके यांच्या मार्गदर्शनाखाली लढत आहे. नगर जिल्ह्यातून माजी सिनेट सदस्य युवराज नरवडे (शेवगाव), सचिन गोर्डे हे विद्यापीठ विकास मंचाकडून लढत आहेत, तर विखे पाटील यांचाही अर्ज आहे. नरवडे यांचा अर्ज खुल्या वर्गातून, तर गोर्डे यांची ओबीसीतून उमेदवारी आहे.

BJP-NCP
जयंत पाटील कडाडले; म्हणाले, मुख्यमंत्र्यांना स्वत:ला निर्णय घेता येत नाहीत...

नरवडेंची तिसरी टर्म

नरवडे हे विखे पाटील यांचे नातेवाईक आहेत. त्यांची ही तिसरी टर्म आहे. नगरला विद्यापीठ उपकेंद्र आणण्यासाठी नेहमीच पाठपुरावा केला. दुसरीकडे नेवाशातून श्रीकृष्ण मुरकुटे यांची उमेदवारी आहे. ते माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे नातेवाईक आहेत. राष्ट्रवादीकडून विद्यार्थी चळवळीतील अमोल खाडे यांचाही भटक्या विमुक्तमधून अर्ज आहे. मात्र, त्यांच्याच प्रवर्गात राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याचा अर्ज आहे. पॅनलचे नेते नेमके कोणाला अधिकृत उमेदवारी देणार हे उद्या स्पष्ट होईल.

BJP-NCP
Gram Panchayat Election : जयंत पाटील यांना मोठा धक्का : स्वतःच्या गावातील ग्रामपंचायतही गमावली

येथे मतदान केंद्र

पेमराज सारडा महाविद्याल, एसएसएसपीएम राहुरी, कला महाविद्यालय सात्रळ, आरबीएनबी श्रीरामपूर, पीव्हीपी प्रवरानगर, सोमय्या कोपरगाव, थोरात महाविद्यालय संगमनेर, ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा, रूपवते महाविद्यालय अकोले, न्यू आर्टस शेवगाव, आव्हाडे महाविद्यालय पाथर्डी, जामखेड महाविद्यालय, दादा पाटील महाविद्याल कर्जत, छत्रपती श्रीगोंदे, न्यू आर्टस पारनेर या ठिकाणी मतदान केंद्र आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in