भाजप बदलणार ZP अध्यक्ष : काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलण्याची या नेत्यांवर जबाबदारी!

अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींचे राजीनामे घेण्याबाबत आमचे एकमत झाले आहे.
भाजप बदलणार ZP अध्यक्ष : काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलण्याची या नेत्यांवर जबाबदारी!
Sanjay patilSarkarnama

सांगली : सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचा राजीनामा घेण्याचा निर्णय आज (ता. १४ ऑक्टोबर) भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत झाला. त्याआधी विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सहकारी पक्ष शिवसेना, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याशी संवाद साधण्याची जबाबदारी खासदार संजय पाटील आणि जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यावर सोपवण्यात आली आहे. बैठकीनंतर नेत्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. (BJP to accept ZP president, resignations in Sangli)

भाजप जिल्हा कार्यालयात झालेल्या या बैठकीला खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सत्यजीत देशमुख, मकरंद देशपांडे, नीता केळकर, सम्राट महाडिक आदी उपस्थित होते.

Sanjay patil
अजित पवार म्हणाले होते, ‘मतांच्या ओझ्याने मी वाकलो पाहिजे...अन्‌ सभासदांनी ते खरे करून दाखवले!

देशमुख म्हणाले, ‘‘प्रदेश नेत्यांकडून जिल्हा परिषदेत बदलाबाबतचे आदेश मिळाले आहेत. ते कसे करायचे, यावर आमची चर्चा झाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींचे राजीनामे घेण्याबाबत आमचे एकमत झाले आहे. त्याआधी या बदलाबाबत सहयोगी पक्ष, संघटना, नेते यांच्याशी विचारविनिमय गरजेचा आहे. सोबतच, विरोधी पक्षांच्या नेत्यांशी आम्ही चर्चा करणार आहोत. जेणेकरून कमी काळासाठी होणारा हा बदल सुटसुटीत पद्धतीने पार पाडण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.’’

Sanjay patil
अजितदादांची विक्रमी कामगिरी : ‘सोमेश्वर’मध्ये राष्ट्रवादीचे सहा जण १६ हजारांच्या फरकाने विजयी

माजी आमदार जगताप म्हणाले,‘‘विरोधी पक्षांसह सहयोगी पक्षांच्या नेत्यांशी बोलण्याची जबाबदारी खासदार संजय पाटील आणि जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यावर सोपवण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत त्या चर्चा होतील आणि राजीनामे व पुढील प्रक्रिया सुरु होईल.’’ खासदार संजय पाटील म्हणाले,‘‘दिलेला शब्द पाळण्यासाठी बदल आवश्‍यक आहे. तो व्यवस्थित पार पडेल, याबद्दल कुणीशी शंका बाळगण्याचे कारण नाही.’’

सांगली जिल्हा परिषदेत इच्छुक कोण आहेत, यावर दोन दिवसांत पुन्हा चर्चा होईल. याआधी ज्यांना संधी मिळाली आहे, ते सदस्य वगळून इतर सदस्यांना संधी दिली जाईल, असे माजी आमदार विलासराव जगताप यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.