२५ जुलैनंतर ठाकरे सरकार बरखास्त होणार : भाजप नेत्याचा बॉम्ब
Shivsena Chief Uddhav ThackeraySarkarnama

२५ जुलैनंतर ठाकरे सरकार बरखास्त होणार : भाजप नेत्याचा बॉम्ब

BJP | Thackeray Government | : राज्यसभा निवडणुकीनंतर भाजपचा आत्मविश्वास दुणावला

सांगली : राज्यसभा निवडणुकीतील (Rajya Sabha Election) महाविकास आघाडीचा ‘कार्यक्रम’ पक्का होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे न बोलता ‘कार्यक्रम’ करण्यात पटाईत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दगाबाजी करून जनादेशाचा अपमान केला. त्याचा फटका त्यांना राज्यसभा निवडणुकीत दिला आहे. विधान परिषद निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होईल आणि २५ जुलै रोजी राष्ट्रपती निवडणूक झाल्यावर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य सरकार बरखास्त करतील, असा दावा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केला आहे. मोदी सरकारला ८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळ्याव्यात हाळवणकर बोलत होते.

सुरेश हाळवणकर पुढे बोलताना म्हणाले, ‘‘मोदी सरकारने ८ वर्षांच्या काळात गरीब कल्याणाच्या अनेक योजना राबवल्या. त्यामुळे सरकारचा जनाधार वाढला आहे. कोरोना महामारीत ८० कोटी जणांना मोफत लस दिली. मजूर, कष्टकरी वर्गासाठी ई-श्रम कार्ड योजना आणली. पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार देणारी आयुष्मान योजना सरकारने राबवली आहे. या योजना कार्यकर्त्यांनी घराघरांपर्यंत पोहोचवाव्यात, त्यामुळे ही सर्व कुटुंबे आयुष्यभर भाजपशी जोडली जातील. येणारा काळ भाजपचा आहे. २०२४ मध्ये उद्धव ठाकरे यांचे मावळे कावळे होऊन उडून गेले असतील. भाजप हा सर्वांत मोठा पक्ष होऊन स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन करेल.’’

खासदार संजय पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून ‘गरीब कल्याण’संबंधीच्या योजना राबवल्या. आठ वर्षांत त्यांनी एकदाही सुटी घेतली नाही. राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेला चमत्कार शरद पवारांनीही मान्य केला. आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, पक्षात कोणी मोठे नाही, लहान नाही. आपण पक्षाचे देणे लागतो, अशा पद्धतीने सर्वांनी येत्या काळात काम करावे.

माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले, ‘‘नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय सुरक्षितता मजबूत केली. काश्मीरचा प्रश्न कायमचा निकाली काढला, हे मान्य करावे लागेल. नजीकच्या काळात निवडणुका ताकदीने स्वबळावर लढवण्याची तयारी करावी.’’ ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी स्वागत केले. शहर-जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी आभार मानले. यावेळी भाजपचे शहर व ग्रामीण कार्यकारिणीचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in