Sharad Pawar : भाजप-शिंदे गटाच्या हातातून महाराष्ट्राची सत्ता जाणार : तो हवाला देत शरद पवारांचे भाकीत

या एजन्सीचे पाच, दहा वर्षांपूर्वीचे सर्व्हे आपण पाहिले आहेत, त्यांची अचूकता बऱ्याचदा सिद्ध झाली आहे.
Rajesh Patil-Sharad Pawar-Hasan Mushrif
Rajesh Patil-Sharad Pawar-Hasan MushrifSarkarnama

कोल्हापूर : देशात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विरोधात जनमत आहे, असे इंडिया टुडे-सी वोटरच्या सर्व्हेवरून दिसून येते. या सर्व्हेतील महाराष्ट्राबाबतची (Maharashtra) आकडेवारी पाहिली तर सत्ताधारी पक्षाच्या हातून सत्ता जाईल, असे दिसणारी आहे. अर्थात हा सर्व्हे आहे. पण, या एजन्सीचे पाच, दहा वर्षांपूर्वीचे सर्व्हे आपण पाहिले आहेत, त्यांची अचूकता बऱ्याचदा सिद्ध झाली आहे. पण, मी एकदम त्याच्यावर जाणार नाही. एक दिशा त्यांनी दाखवलेली आहे. ती दिशा सत्ताधारी पक्षाला सोयीची नाही, असे दिसते आहे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोल्हापुरात बोलताना सांगितले. (BJP-Shinde group will go to power in Maharashtra : Sharad Pawar's prediction)

कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. ते म्हणाले की, देशात काँग्रेसच्या जागा वाढतील, असे दिसत आहे. उदा. कर्नाटकचा सर्व्हे वेगळा आहे. त्याची माहिती आम्ही अधिक घेतली. त्यात आम्हाला स्वच्छ असे दिसतंय की, कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता राहणार नाही. लोक त्या ठिकाणी परिवर्तनाला उत्सुक आहेत. असे चित्र कदाचित अनेक ठिकाणी असू शकेल. पण, उत्तर प्रदेश हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याची निश्चित माहिती आमच्याकडे नाही.

Rajesh Patil-Sharad Pawar-Hasan Mushrif
Nashik Graduate Constituency : नाशिक ‘पदवीधर’बाबत भाजपचं ठरलं : 'हा' निर्णय होणार जाहीर

विरोधकांची मोट बांधण्यासाठी सर्व एकत्र काम करत आहोत. मात्र, सध्य स्थितीबाबत अद्याप काही सकारात्मक सांगण्यासारखे काही नाही. मी स्वत: अनेकांशी बोलतो आहे. अनेकांना एकत्र आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पण काही ना काही तरी स्थानिक मुद्दे आहेत. उदाहरणार्थ केरळमध्ये आज डाव्यांचं आणि राष्ट्रवादी व अन्य सगळे एकत्र येऊन आमचं सरकार तिथे आहे. पण, आमचा मुख्य विरोधक काँग्रेस आहे. राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणि काँग्रेस एकत्र येऊ इच्छितो. पण काही राज्यात तिथली स्थानिक परिस्थिती ही अनुकुल नाही. या अडचणी आम्हाला सोडवाव्या लागतील. सुदैवाने दोन दिवसांनी संसदेचे अधिवेशन सुरू होईल. सगळेच लोक भेटतील आणि त्यामुळे हा संवाद सुरू करता येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Rajesh Patil-Sharad Pawar-Hasan Mushrif
Rajendra Raut News : भाजप समर्थक अपक्ष आमदार राऊत यांच्या संपत्तीची होणार चौकशी : हायकोर्टाचा आदेश

पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशी आघाडीची चर्चा झालेली आहे. पुढील निवडणुकीला आम्ही एकत्रिपणे सामोरे जाऊ, असे आमचे मत आहे. वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासोबत आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही, त्यामुळे आम्ही त्याची चर्चा करणार नाही. यावर चर्चाच होऊ शकत नाही. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय, यावर कोण काही बोलतेय याकडे आम्ही लक्ष देत नाही. परंतु आमचा अनुभव आहे की, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in