Rohit Pawar News : रोहित पवारांना महिन्यातच दुसरा धक्का; बाजार समितीनंतर खर्डा ग्रामपंचयतही भाजपच्या तब्यात

Ram Shinde and Kharda Grampanchayat : सरपंचपदी संजीवनी वैजीनाथ पाटील यांची निवड
Sanjivani Patil
Sanjivani PatilSarkarnama

Ahmednagar Politics : राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार यांना जामखेडमधून महिन्यातच दुसरा धक्का बसला आहे. बाजार समितीनंतर जामखेडमधील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या खर्डा ग्रामपंचायतवर भाजपने झेंडा फडकला आहे. या ग्रामपंचातीच्या सरपंचपदी भाजपच्या संजीवनी वैजीनाथ पाटील यांची निवड झाली आहे. या विजयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली खर्डा ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात गेली आहे.

जामखेड बाजार समितीत भाजप-राष्ट्रवादीकडे समसमान ९ संचालक होते. त्यावेळी ईश्वर चिठ्ठीने आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांना साथ दिली. त्या पाठोपाठ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीत शिंदे यांचाच वरचष्मा राहिला. खर्डा हे तालुक्यातील मोठी बाजारपेठ व राजकीय दृष्टीने महत्वाची मानली जाणारी ग्रामपंचयत आहे. ही ग्रामपंचायत आता माजीमंत्री आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेते रविंद्र सुरवसे यांनी ताब्यात घेतली आहे.

Sanjivani Patil
KCR and Pune : के. चंद्रशेखर रावांचा आता पुण्याकडे मोर्चा; लवकरच होणार जाहीर सभा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) ताब्यात खर्डा ग्रामपंचायत होती. तत्कालीन सरपंच नमीता गोपाळघरे यांनी मुदत संपल्याने राजीनामा दिला. त्यानंतर सोमवारी (ता. ५) सरपंचपदाची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत संजीवनी पाटील यांना ९ तर रोहिणी प्रकाश गोलेकर यांना आठ मते पडली. या मतदानातून आमदार पवार गटाचे दोन सदस्य फुटून आमदार शिंदे गटाकडे गेल्याचे दिसून येत आहे.

Kharda Election
Kharda ElectionSarkarnama

यावेळी भाजप कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रवींद्र सुरवसे म्हणाले की, "ही ग्रामपंचायत अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. त्यांच्या सरपंचांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर सरपंचपदासाठी निवडणूक झाली. यात संजीवनी पाटील जिंकल्या. त्यामुळे तालुक्यातील सर्वात मोठी खर्डा ग्रामपंचायच्या सरपंचपदाच्या माध्यमातून भाजपच्या (BJP) ताब्यात आली."

Sanjivani Patil
NCP News : लोकसभेत चांगली कामगिरी केलेल्यांचाच विधानसभेसाठी विचार करणार !

बाजार समिती सभापती शरद कार्ले यांनी आमदार पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, "खर्डा ग्रामपंचायत (Kharda Gharmpanchayat) आसो की जामखेड बाजार समिती या माध्यमातून भाजपाचा झालेला विजय ही सुरुवात आहे. आता २०२४ ला कौल कुणाच्या बाजूने असेल हे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना कळेल."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com