बारामतीचा गडी ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला असेल ; सदाभाऊंनी उडवली पवारांची खिल्ली

#SharadPawar बारामतीचा गडी एवढा हुशार कसा?
Sadabhau Khot, Sharad Pawar
Sadabhau Khot, Sharad Pawarsarkarnama

सांगली : भाजपचे नेते, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला.

भाजपचे (bjp) आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदार निधीतून आटपाडी तालुक्यात विविध विकास कामांचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी खोत यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीकास्त्र डागले. (Sadabhau Khot latest news)

शरद पवार यांची नुकतीच ब्राह्मण समाजाने भेट घेतली, यावरुन पवारांवर खोत यांनी टीका केली. सदाभाऊ खोत म्हणाले, "नुकतीच ब्राह्मण समाजाने शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पवारांनी ट्वीट करून दुसऱ्यांच्या आरक्षणाला तुम्हाला विरोध करता येणार नाही, असं ब्राह्मण समाजाला सांगितलं. मात्र आम्ही असं म्हटलंच नाही, हे ब्राह्मण समाज आता ओरडून सांगत आहे. त्यामुळे बारामतीचा गडी कसा आला, हे आपण मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहोत, मला वाटतं की हा गडी ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला असेल. इतका बिलंदर माणूस राजकारणात कधीही मिळणार नाही,"

Sadabhau Khot, Sharad Pawar
ED chargesheet : अनेकदा समन्स पाठवूनही मलिक यांची पत्नी, मुलगा चौकशीसाठी गैरहजर

'बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवार यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट टाकले आहेत? हे मी वर गेल्या-गेल्या ब्रह्मदेवाला विचारणार आहे,' असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी यावेळी लगावला.

फडणवीसाचं वाक्य खरं करायचयं..

भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सदाभाऊ खोत यांनी भाष्य केलं.'मी पुन्हा येईन, हे वाक्य आपल्याला खरं करायचं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं आहे. हे लोक त्यांच्या वाक्याची खिल्ली उडवतात. मात्र शेतकऱ्यांचा दुष्काळ हटवण्यासाठी, त्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यासाठी आणि बारा बलुतेदारांना न्याय देण्यासाठी, मी पुन्हा येईन, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं,' अशा शब्दांत खोतांनी फडणवीसांचं समर्थन केलं आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला, आता महाविकास आघाडीतील नेते याला काय प्रत्युत्तर देतात हे लवकरच समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in