Satara : भाजप युवा मोर्चाने केला अजित पवारांच्या पुतळ्याचा कडेलोट...

BJP भाजप-हिंदुत्ववादी संघटनांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप रस्त्यावर उतरली आहे.
BJP andolan satara
BJP andolan satara sarkarnama

Ajit Pawar News : विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी (Chhatrapati Sambhaji Maharaj) केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा भारतीय जनता पक्ष व युवा मोर्चाच्या वतीने आज साताऱ्यात निषेध नोंदविण्यात आला. भाजप युवा मोर्चाने अजिंक्यतारा किल्ल्यावर जाऊन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट केला. तसेच निषेधाच्या घोषणाही दिल्या.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावरुन सध्या राजकारण पेटलं आहे. भाजप-हिंदुत्ववादी संघटनांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप रस्त्यावर उतरली आहे.

साताऱ्यात आज भारतीय जनता पक्षाने सातारा पालिकेसमोरील अभयसिंहराजे भोसले उद्यानातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन केले. प्रथम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. त्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

BJP andolan satara
Ajit Pawar Vs Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर अजित पवार भडकले

दरम्यान, भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अजिंक्यतारा किल्ल्यावर जाऊन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट केला.तसेचश्री. पवार यांचा निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी भाजप तसेच युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

BJP andolan satara
Ajit Pawar : शिंदे गटातील आमदारांच्या 'वाय प्लस' सुरक्षेला किती खर्च? अजितदादांनी आकडाच सांगितला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com