भाजपमध्ये लेटरबॉम्ब : निष्ठा नसणाऱ्यांसाठी पदाधिकारी बदल का करायचा?; राजीनाम्यास नकार

पदाधिकारी बदलाच्या प्रक्रियेत आज पुन्हा एक नवा पेच निर्माण झाला आहे.
BJP
BJPSarkarnama

सांगली : भारतीय जनता पक्षाविषयी निष्ठा नसणाऱ्यांसाठी पदाधिकारी बदल कशासाठी करायचा, असा सवाल सांगली झेडपी पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. यामुळे पदाधिकारी बदलाच्या प्रक्रियेत आज पुन्हा एक नवा पेच निर्माण झाला आहे. झेडपी पदाधिकारी बदलाच्या चर्चा सुरू असताना अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्यासह तीन सभापतींनी राजीनामा देण्यास विरोध केला आहे. त्यांनी खरमरीत पत्रच भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुखांना आज दिले. आता भाजप कोअर कमिटी यावर कोणता निर्णय घेणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष आहे. (BJP office bearers in Sangli Zilla Parishad refuse to resign)

सांगली जिल्हा परिषदेतील भाजप आघाडीच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना बदलण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. त्यानुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींच्या राजीनामाच्या निर्णय झाला आहे. खासदार संजय पाटील समर्थक प्रमोद शेंडगे यांनी आपला राजीनामाही दिला. सत्ताधारी आघाडीतील काही नेत्यांनी मात्र या बदलाला विरोध दर्शविला आहे. पदाधिकारी बदलाचे राजकारण सुरु असताना अध्यक्षा कोरे, उपाध्यक्ष डोंगरे सभापती सर्वश्री माळी, पाटील, पवार यांनी राजीनामा का देण्यात यावा, असे पत्रच जिल्हाध्यक्ष देशमुखांना दिले.

BJP
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या स्वागताला शिवसेना आमदाराची हजेरी

पदाधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे की, भाजपबद्दल निष्ठा नसणाऱ्यांसाठी पदाधिकारी बदल कशासाठी करायचा. पक्ष बदलणारे, बदलण्याचे धमकी देणाऱ्यावर किती विश्वास कसा ठेवावा, अशी विचारणाही पत्रातून करण्यात आली आहे. पदाधिकारी बदलाबाबत चर्चांना उधाण आले आहे. झेडपीत भाजपला बहुमत नाही. पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यास पुन्हा पक्षाचे पदाधिकारी होतील, याची खात्री नाही. महापालिकेत पक्षाचे बहुमत असताना महापौर झाला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या भरवशावर काही नेते बोलतात. त्यांची जाहीर, खासगीत चर्चा वेगळी आहे. यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही.

BJP
संतोष जगताप खून प्रकरणाच्या मास्टर माईंडला अटक; पाटसमधील एका व्यक्तीवरही संशय

घटक पक्षातील रयत आघाडी, घोरपडे गट, शिवसेना पक्षालाही यात विश्‍वासात घेतले नाही. नेत्यांच्या आदेशानंतरच आम्ही राजीनामा देऊ. झेडपी निवडणूक फेब्रुवारी २०२२ ला होईल. जानेवारीत आचारसंहिता लागल्यानंतर विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळणार नाही. नवीन पदाधिकाऱ्यांना वेळ न मिळाल्याने कामांवर परिणाम होईल. या पार्श्‍वभूमिवर पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा विषय तूर्त थांबवावा, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

पक्षाला सोडचिठ्ठी देणारे सूचक, अनुमोदक

पदाधिकारी बदलासाठी आग्रही असलेले खासदार पाटील यांचे समर्थक सदस्य प्रमोद शेंडगे यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनामा पत्रावर भाजप सोडलेले सरदार पाटील, नितीन नवले हे सूचक, अनुमोदक आहेत. याचा अर्थ काय? याचीही चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com