Satara : भाजप, राष्ट्रवादीत संघर्ष पेटला : नेत्यांचे पुतळे जाळण्याचे प्रकार ...

म्हसवड कॉरिडॉर एमआयडीसीवरून Corridor MIDC सध्या विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar व भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे Jaykumar Gore यांच्यातील संघर्ष उफाळून Conflict has erupted आला आहे.
In Satara NCP, BJP  Conflict
In Satara NCP, BJP Conflict sarkarnama

सातारा : कॅरिडॉर एमआयडीसीवरून सध्या राष्ट्रवादी भाजपच्या नेत्यांत संघर्ष पेटला आहे. काल फलटण तालुक्यात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, रणजितसिंह निंबाळकर यांच्य प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. त्याला किनार माजी सभापती रामराजे व आमदार जयकुमार गोरे यांच्यातील वादाची आहे. या दोन नेत्यांतील संघर्ष त्यांच्या कार्यकर्त्यांत पोहोचला आहे. साताऱ्यात राष्ट्रवादी विद्यार्थी सेलच्या कार्यकर्त्यांनी आमदार गोरे, खासदार निंबाळकरांचा निषेध नोंदविला.

म्हसवड कॉरिडॉर एमआयडीसीवरून सध्या विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्यातील संघर्ष उफाळून आला आहे. मागील काही दिवसांत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या माण दौऱ्यावेळी तेथील आमदार गोरे समर्थकांनी रामराजेंना काळे झेंडे दाखवून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते.

In Satara NCP, BJP  Conflict
म्हसवड 'एमआयडीसी'ला माझा विरोध कधीच नव्हता : रामराजे

या वरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार गोरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन चुकीच्या कृतीस जशास तसे उत्तर मिळेल, असा इशारा दिला होता. हा वाद कॉरिडॉर माण की उत्तर कोरेगाव तालुक्यात व्हावा यावरून झाला होता. नेत्यांचा वाद कार्यकर्त्यांत शिरल्याने फलटण व सातारा तालुक्यात ही निषेध आंदोलने व पुतळा जाण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

In Satara NCP, BJP  Conflict
धमक असेल तर MIDC कोरेगावला नेऊन दाखवा... जयकुमार गोरेंचे रामराजेंना प्रतिआव्हान

काल विजयादशमीच्या दिवशीच भाजपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सायंकाळी सहाच्या सुमारास रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निषेधाच्या तर भारतीय जनता पार्टीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा, सचिन अहिवळे, अभिजित नाईक निंबाळकर, डॉ. मधुकर माळवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

In Satara NCP, BJP  Conflict
सांगोल्यात खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या ‘लाव रे फोन’ची चर्चा!

भाजपच्या या कृतीनंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुतळ्याचे डीएड कॉलेज चौक येथे दहन केले. तसेच भाजपच्या निषेधाच्या घोषणा देत दहशतीचे राजकारण खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. यावेळी माजी नगरसेवक विक्रमभैय्या जाधव, भाऊ कापसे व अन्य पदाधिकारी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

In Satara NCP, BJP  Conflict
जेव्हा शिवसेनेच्या दांडीयात भाजप आमदाराची एन्ट्री होते!

यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास साखरवाडी येथेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दहन केले. कालच्या घटनेनंतर साताऱ्यात पोवईनाक्यावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष वैभव कळसे यांच्या नेतृत्वाखाली खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार गोरे यांचा निषेध नोंदविला.

In Satara NCP, BJP  Conflict
Karad : कराड दक्षिणमधून अतुल भोसलेंनाच आमदार करा... जयकुमार गोरे

मात्र, आंदोलनाला परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास परवानगी लागते का, असा प्रश्न आमदार बाळासाहेब पाटील यांनी उपस्थित केला. त्यामुळे सातारा जिल्ह्यात भाजप व राष्ट्रवादीतील संघर्ष अधिकच पेटण्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com