BJP Vs NCP : कोपरगावमध्ये दोन राजकीय गटांत वाद : पोलिसांकडून सौम्य लाठीमार

कोपरगाव नगरपालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत.
BJP-NCP
BJP-NCPSarkarnama

BJP Vs NCP : कोपरगाव नगरपालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. गुरुवारी ( ता. 18 ) कृष्ण जन्माष्टमी तर शुक्रवारी ( ता. 19 ) गोपाळकाला आहे. सणांचे औचित्य साधत राजकीय पक्ष शक्ती प्रदर्शन करण्यात व्यस्त आहेत. कोपरगावातही सणांचे औचित्स साधण्याच्या राजकीय हेतूने प्रयत्न झाला. त्यातून दोन राजकीय पक्षांच्या गटांत वाद झाला.

BJP-NCP
तो स्पॉट जीवघेणा : मेटेंनी जीव गमावला; संग्राम जगतापांच्या गाडीचा चक्काचूर

कोपरगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये सत्ता संघर्ष आहे. यातच कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वागत कमान उभारण्यात येत असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही स्वागत कमान अतिक्रमण असल्याचे सांगत कमानीला विरोध दर्शवला. मंगळवारी ( ता. 16 ) दिवसभर दोन्ही गट आमने-सामने आले होते.

स्वागत कमानीच्या वादावरून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांची पोलीस निरीक्षक व उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी बैठक घेतली. सकाळपर्यंत कमान काढण्याचे आश्वासन प्रशासनाने भाजप कार्यकर्त्यांना दिले. मात्र रात्रीच्या वेळी दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

BJP-NCP
राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते, अण्णा बनसोडे अन् आशुतोष काळे अजून मुंबईबाहेर!

यातून दोन्ही गटात वाद निर्माण झाला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांचा विजय असोच्या घोषणा दिल्या तर भाजप कार्यकर्त्यांनी युवा नेते विवेक कोल्हे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने घोषणा दिल्या. त्यामुळे काही काळ तनावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटना स्थळी आले. कोपरगाव पोलिसांसह शीघ्र कृती दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

दोन्ही गट एकमेकांविरोधात आक्रमक झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले. त्यांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण देत स्वागत कमान हटवली. जमावाला नियंत्रित करताना कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचा छोटा अपघात झाल्याने ते जखमी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com