विधान परिषद निवडणुकीची समीकरणे सांगलीत जुळणार? : जयंतरावांच्या गाडीत संजयकाका....

Sanjay Patil | Jayant Patil | Sangali Politics : राज्याच्या राजकारणावर कराडमध्ये खलबत
Jayant Patil | Sanjay Patil
Jayant Patil | Sanjay PatilSarkarnama

कराड : सांगलीचे भाजप खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि सांगलीचे (Sangli) पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांची आज (बुधवारी) कराडमध्ये आवर्जून भेट घेतली. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या त्यातही सांगलीच्या राजकारणात येणाऱ्या काही दिवसात कोणत्या नवीन घडामोडी घडणार याबाबतच्या चर्चा रंगल्या आहेत. कराडमध्ये विमानतळावर मंत्री पाटील यांची खासदार पाटील वाट पाहत गेस्ट हाऊसवर थांबले होते. मंत्री पाटील येताच त्यांच्या वाहनातून दोघेही तत्काळ रवानाही झाले. (Jayant Patil Latest News)

कराड तालुक्यातील घारेवाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर आज झाले. या शिबाराला भेट देण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील येथे आले होते. विमानाने कराडच्या विमानतळावर ते उतरले. त्यावेळी विमानतळावर राष्ट्रवादीतच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. मात्र मंत्री जयंत पाटील येणार असल्याने त्यांची भेटीसाठी भाजपचे खासदार संजय पाटीलही तेथे आले होते. संजय पाटील यांना पाहून राष्ट्रवादीचे पदाधिकारीही अवाक झाले होते. त्यांच्यातही चर्चा सुरू होती. (NCP| Jayant Patil Latest News)

मंत्री पाटील व खासदार पाटील यांच्यात दोस्ताना सुरू असल्याची सांगलीच्या राजकारणात सध्या जोरदार चर्चा आहे. त्याला पुष्टी देणारी ही आजची भेट ठरली. मंत्री पाटील विमानाने येताच खासदार पाटील तात्काळ त्यांच्या वाहनात बसले. स्वागत संपताच पाहुणचारही न घेता मंत्री पाटीलही त्वरीत वाहनात बसले. दोघे वाहनात बसताच वाहन थेट विमानतळातून बाहेर पडले. ते वाहन कार्यक्रमाकडे रवाना झाले. मात्र पुढे घारेवाडी फाट्यावर खासदार पाटील उतरून मागून येणाऱ्या त्यांच्या वाहनात बसून सांगलीकडे रवाना झाले. सांगलीहून फोनव्दारे त्या घटनेची अनेकांनी माहिती घेतली. सोशल मिडीयावरही या भेटीची चर्चा होती. (Jayant Patil Latest News)

विधानपरिषदेचे समीकरणं?

दरम्यान, महत्वाच्या चर्चेसाठीच खासदार पाटील यांनी मंत्री पाटील यांची गोपनीय पण तातडीची भेट घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येत आहे. सरकारनामाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगमी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची चर्चा होती. सध्या भाजपने संख्याबळापेक्षा एक उमेदवार जास्तीचा उतरवल्याने निवडणूक जाहीर झाली आहे. याच विधान परिषद निवडणुकीची सुत्र जयंत पाटील यांनी पूर्णतः आपल्या हातात घेतली आहेत. त्यामुळे या निवडणुकीची समीकरणं ही सांगलीतून जुळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com