Dr Heena Gavit Accident : भाजप खासदार हीना गावित यांच्या गाडीला अपघात ; थोडक्यात बचावल्या

खासदार हिना गावित यांच्या नाकाला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्या नाकाच्या हाडावर लागल्याने फॅक्चर झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Heena Gavit
Heena Gavitsarkarnama

नंदुरबार : भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित ( Heena Gavit)यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. अपघात त्या थोडक्यात बचावल्या आहेत. त्यांच्या कारमधील कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. (Dr Heena Gavit Accident news)

नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार हिना गावित या काल (रविवारी) आपल्या कार्यकर्त्यांसह कारने एका खाजगी पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी जात होत्या. यावेळी हा अपघात झाला आहे.

दुचाकीस्वार महिलेला वाचवित असलाताना कार दुभाजकावर आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातात गावित यांच्यासह कारमध्ये असलेले त्यांचे काही कार्यकर्तेही किरकोळ जखमी झाले आहे. गावित यांची कार दुचाकीला धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातावेळी गावित यांची कार एका झाडाला जाऊन आदळली.

गावित यांच्यासह कार्यकर्त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण पुढील उपचारांसाठी रेल्वेने त्या उपचारांसाठी मुंबईत दाखल होणार आहेत.नंदुरबार शहरातील गुरव चौक येथे हा अपघात झाला आहे.

Heena Gavit
MNS On Sanjay Raut : राऊतांना जेल मधून लिखानाची परवानगी ?; मनसेचा 'रोखठोक' प्रश्न

या अपघातात दुचाकीवरील महिला आणि पुरुष जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्या गाडीला धडकलेल्या दुचाकीवरील महिला आणि पुरुष यांनाही दुखापत झाली, सध्या त्यांच्या उपचार सुरु असून दोघांची प्रकृती स्थिती आहे.

खासदार हिना गावित यांच्या नाकाला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्या नाकाच्या हाडावर लागल्याने फॅक्चर झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघातावेळी गावित यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते सुभाष पाटील, महेंद्र पटेल, जीतू पाटील, प्रतिक जैन हे कारमध्ये उपस्थित होते. यातील सुभाष पाटील यांना पायाला तर महेंद्र पटेल यांच्या हाताला दुखापत झाली आहे. तर जीतू पाटील, प्रतिक जैन हे किरकोळ जखमी झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com