धनंजय महाडिकांच्या भीमा परिवाराचा सोहाळे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचा चौकार

भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांच्या नेतृत्वाखालील भीमा परिवार विकास आघाडीने सलग चौथ्यांदा निर्विवाद बहुमत मिळविले.
Bhima parivar
Bhima parivarSarkarnama

मोहोळ (जि. सोलापूर) : मोहोळ तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या सोहाळे ग्रामपंचायतीवर (Gram Panchayat) खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या गटाचे भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांच्या नेतृत्वाखालील भीमा परिवार विकास आघाडीने सलग चौथ्यांदा निर्विवाद बहुमत मिळविले. भीमा परिवार विकास आघाडी विरुद्ध समविचार विकास आघाडी अशी या निवडणुकीत लढत झाली. या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तालुक्यात भीमा परिवाराने विजयश्री खेचून आणून आपले खाते उघडले. येथील सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी खुले आहे. (BJP MP Dhananjay Mahadik group rule over Sohale Gram Panchayat)

सोहाळे ग्रामपंचायत ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. या ग्रामपंचायतीच्या अकरा जागेसाठी २४ उमेदवार रिंगणात होते. एकूण २ हजार ५७५ मतदारांपैकी २ हजार २३४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. गेल्या पंधरा वर्षांपासून या ग्रामपंचायतीवर धनंजय महाडिक यांच्या भीमा परिवाराचे वर्चस्व आहे. गेल्या पंधरा वर्षांत भीमा परिवाराचे नेते जगताप यांनी गावातील रस्ते, पाणी, वीज, या मूलभूत सुविधा नागरिकांना दिल्या, तर उर्वरित विकास या पाच वर्षांत करू असे त्यांनी सांगितले.

Bhima parivar
भाजपच्या सुभाष देशमुखांना झटका : ग्रामपंचायतींमधील सत्ता शिवसेना-काँग्रेसने हिसकावली

विरोधी समाविचारी आघाडीत राष्ट्रवादीच्या माजी सभापती अंबिका पाटील, एकनाथ जगताप, अंकुश जगताप यांचा समावेश होता. समविचारी आघाडीने जो नागरिक ग्रामपंचायतीचा कर संपूर्ण भरेल त्याला वर्षभर मोफत दळण व जलशुद्धीकरण यंत्राचे पाणी मोफत, रस्त्याच्या कडेला पेव्हिंग ब्लॉक बसविणे, तसेच ग्रामदैवत गैबीपीर देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करणे हा वचननामा जाहीर केला होता. मात्र त्यांना मतदाराने नाकारले.

Bhima parivar
बार्शीत राजेंद्र राऊतांचीच हवा : दोन्ही ग्रामपंचायतींवर फडकवला विजयाचा झेंडा!

निवडणूक निकाल जाहीर होताच महाडिक समर्थकांकडून तहसील कार्यालय ते सोहाळे अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली. विजयानंतर (स्व.) भीमरावदादा महाडिक यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. ठिकठिकाणी विजयी उमेदवारांचे सत्कार करण्यात आले. या निवडणुकीत उपाध्यक्ष सतीश जगताप यांचे चिरंजीव ऋषिकेश जगताप यांना सर्वात जास्त ४९७ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. एम. माळी यांनी काम पाहिले.

Bhima parivar
एकनाथ शिंदे गटाचा पहिला विजय : पंढरपूरच्या टाकळी ग्रामपंचायतीवर मिळवली एकहाती सत्ता

विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते : कांबळे श्रीमंत देवाप्पा ३९४, नाईकनवरे बाळासाहेब नवनाथ ३८६, जगताप विजया अर्जुन ३८५, जगताप ऋषिकेश सतीश ४९७, बचुटे विद्या चंद्रकांत ४८५, बाबर नकुशा संजय ४८०, जगताप अंकुश भागवत २३५, गौडदाब छाया सारंग २५२, सोनवणे धर्मराज सिद्राम २३५, गौडदाब माया ईश्वर २३४, पवार अनुराधा किरण २४०

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com