BJP : आगे...आगे देखो...होता है क्या? पराभवानंतर आमदार आवताडेंचा सूचक इशारा

पालिका निवडणुकीत आवताडे-परिचारक आमनेसामने येणार?
BJP MLA Samadhan Awatade Latest News, Prashant Paricharak News
BJP MLA Samadhan Awatade Latest News, Prashant Paricharak NewsSarkarnama

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीत एकत्रित आलेले माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) आणि आमदार समाधान आवताडे (samadhan Avtade) आता दामाजी साखर कारखाना निवडणुकीनंतर दुरावले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आवताडे यांनी आगे...आगे देखो... होता है क्या?, असा सूचक इशारा दिल्यानं तालुक्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. (BJP Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त शुक्रवारी (ता.22) आवताडे यांनी विठ्ठल मंदिरात तुळजी पूजा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. पालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आवताडे यांना विचारले असता ते केवळ आगे..आगे देखो होता है क्या? एवढंच बोलले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये परिचारक-आवत़ाडे एकत्रित लढणार की, एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकणार यावरून आता चर्चांना उधाण आलं आहे.

BJP MLA Samadhan Awatade Latest News, Prashant Paricharak News
पंतप्रधानांनी लोकार्पण केलेला पंधरा हजार कोटींचा एक्सप्रेसवे पाच दिवसांच्या पावसात उखडला!

विधानसभा पोट निवडणुकीनंतर समाधान आवताडे यांनी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात चांगलेच राजकीय बस्तान बसविले आहे. पंढरपूर शहरासह मतदारसंघातील गावातील कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयारी केली आहे. त्यातूनच परिचारक गटात काहीशी अस्वस्थता असल्याची चर्चा आहे.

संत दामाजी साखर कारखाना निवडणुकीत आवताडे यांच्या विरोधातील समविचारी आघाडीला परिचारकांनी उघडपणे पाठिंबा दिला होता. त्यामुळे आवताडे गटात नाराजी आहे. या निवडणुकीतील पराभव आवताडे यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसते. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये त्यांनी ऐकला चलो रे चा नारा दिल्याचे समजते.

BJP MLA Samadhan Awatade Latest News, Prashant Paricharak News
BS Yediyurappa : येडियुरप्पांचा उत्तराधिकारी ठरला; विधानसभा निवडणूक न लढण्याची घोषणा

मंदिरातही दोन गट दिसले?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार समाधान आवताडे व त्यांच्या कार्यकर्त्यानी मंदिरात जावून पूजा केली. त्यानंतर काही वेळातच प्रणव परिचारक यांनी पदाधिकाऱ्यांसह मंदिरात जावून पूजा केली. त्यामुळे आवताडे व परिचारक गटात चांगला दुरावा निर्माण झाल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com